नागशास्त्र एक अद्भुत गाथा (भाग - पंचवीस )


चौथा दरवाजा उघडतो तस वेदांगीला एक सुंदर दृश्य दिसत. पण म्हणतात न चमकणारी प्रत्येक वस्तु ही सोन असतेच अस नाही. असच काहीस इथे ही होत वेदांगी या वेळी एका वेगळ्याच चक्रव्युहात अडकली होती. आणि हे तीला माहीत देखील नव्हत. ती या वेळी एका वेगळ्याच जगात पोहोचली होती. आणि ते दृश्य बघुन इतकी मोहीत झाली होती की नेमक तीच काय उद्देश्य आहे हेच ती विसरली. आणि हे चक्रव्युह होत असुर भयासुरच. हो भयासुरचच.

भयासुरचे असुर वेदांगीच्या मागावरच होते त्याची नजर होती नागशास्त्र आणि नागमणी वर. परंतु भयासुरच्या शक्ती वेदांगीवर काम करत नव्हत्या त्यामुळे त्याने हे चक्रव्युह रचले होते. आणि आता ह्या चक्रव्युह मध्ये वेदांगी पुर्ण अडकली होती.

चौथा दरवाजा उघडताच वेदांगी एका बर्फाछादित ठीकाणी प्रवेश करते तीच्या असपास सगळी कडे बर्फच बर्फ असतो तीथेच समोर एक लहानशी झोपडी असते.

त्या झोपडी समोर एक पहाडी वेशातला लहानसा मुलगा आणि मुलगी खेळत असतात. त्यांना बघुन असच वाटत असत की ते बहीण भाउ असावेत. ती त्यांचा खेळ बघण्यात मग्न असते.



काही वेळा नंतर...

अचानक दोघ मुल आपल्यातच भांडु लागतात आणि क्षणार्धात ती मुल अक्राळ विक्राळ रुप धारण करतात वेदांगीला हे सगळ समजण्याच्या पलीकडच असत.

ती विचार करू लागते. “हे सगळ आपल्या बाबतीत काय घडतय आपण कुठे चुकलो तर नाही. आज पर्यंत जे काही आपण बघीतल ते सगळ नागशास्त्रच्या माध्यमातुन मग हे काय.”

ती आपले डोळे बंद करते आणि वैश्णवीच्या शक्तीचा उपयोग करुन जाणुन घेण्याचा प्रयत्न करु लागते. काहीच क्षणात तीला समजत आपण एका वेगळ्याच जगात अडकलो आहे आपल उद्देश्य इथे थांबण नाही तर दुसरी कडे आहे ती परत निघण्यासाठी मागे वळते तस तो दरवाजा अचानक गायब होतो आणि वेदांगी त्या रहस्यमयी दुनियेत अडकते.

पण तीला स्वथ:वर विश्वास ही तेवढाच असतो ती विचार करते.

“आत्ता पर्यंत आपण पर्मेश्वराच्या मार्गावर चालुन इथपर्यंत आलोय आता पुढचा मार्ग ही तेच दाखवतील”

असा विचार करुन ती पुढे चालु लागते. तीच्या चहु बाजुंनी बर्फच बर्फ असतो. आणि ती मात्र त्यातुन मार्ग काढत काढत पुढे जात असते.

काही क्षणा नंतर...

ती त्या घरा समोर येउन उभी रहाते तेवढयात त्या दोघांच तीच्याकडे लक्ष जात आणि ते दोघ आपल भांडण लगेच आवरत घेतात.

वेदांगीला समजुन गेलेल असत की आता आपण या रहस्यमयी दुनियेत अडकलो आहोत आता इथुन पुढे आपल्याला खुप विचार करुन मार्ग काढावा लागेल. शक्तीने नाही युक्तीने काम कराव लागेल.

ती विचार करतच असते की त्या दोन्ही मुलांपैकी एक जण बोलु लागत.

रत्नमाला – “कोण आहेस तु तुला माहीत नाही ही जागा सुरक्षीत नाहीये हे राज्य भयासुरच आहे इथे जी व्यक्ती येते ती परत जात नाही.”

वेदांगी – “मला खरच माहीत नव्हत खर तर मी रस्ता चुकली आहे. कृपा करुन काही मदत करु शकाल का तुम्ही.”


वेदांगीला सगळ माहीत असत. तरी सुध्दा त्यांच्या मनात नक्की काय चालु आहे हे जाणुन घेण्या साठी ती त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न करते.

वेदांगी जस त्यांच्याशी बोलु लागते तस त्यांची नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी व्हायला लागतो आणि त्यांना त्रास होउ लागतो.

तो त्रास त्यांना सहन होत नाही आणि अचानक दोघ तीथुन गायब होतात.

काही क्षणात तीथला परिसर अचानकपणे बदलुन जातो बर्फाछादित ती जागा आता रस्त्यांनी घेतलेली असते. वेदांगीच्या सकारात्मक उर्जेमुळे भयासुरच्या जादुई चक्रव्युहला तडा गेलेला असतो वेदांगी तशीच पुढे सरकते. आणि जीथे रस्ता मिळेल तीथे ती जात रहाते.

दिवस सरतात महिने सरतात वेदांगी नुसती चालत असते आपली तहान भुक विसरुन.

तब्बल आठ महिन्यां नंतर...

ती एका छोट्याशा झोपडी समोर उभी असते. ती झोपडी असते नागदेवी वैश्णवीच्या पुर्वजन्मीच्या म्हणजेच कृपालीची.

कृपाली ही एक श्री कृष्ण भक्त होती तीचा सगळा वेळ हा भक्ती करण्यातच जायचा. कृपाली फक्त श्री कृष्ण भक्त नव्हती तर एक चांगल्या मनाची व्यक्ती देखील होती.

एक दिवस असच नागराज श्रीधर हे तीच्या घराच्या रस्त्यानी जात असताना त्यांना काही पक्ष्यांना मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा कृपाली ने त्यांचा जीव वाचवला हे बघुन नागराजांनी कृपालीला वरदान दिल की तु पुढील जन्मी माझी मुलगी बनुन येशील. हीच ती कृपाली नागदेवी चा पुर्वजन्म.

वेदांगी आता त्यांच्याच समोर घरासमोर उभी होती.

ती आवाज देणार तेवढयात कृपाली देवी बाहेर येतात. आणि वेदांगीच ते तेज बघु हरखुनच जातात या आधी त्यांनी अस तेजस्वी रुप कधीच पाहीलेल नसत.

त्या तीला बघतच रहातात.

काही क्षणा नंतर...

भानावर येत वेदांगीला विचारतात.

कृपाली – “देवी कोण आपण ? कुठून आलात?”

वेदांगी – “मी वेदांगी, नागशास्त्रच्या सफरी तुन आले खुप महिन्यां पासुन नुसती फिरत आहे. आता कुठे एक चेहरा दिसला आता हा मार्ग मला अजुन कुठे नेणार आहे माहीत नाहीत नाही. पण देवी आपण कोण”


कृपाली – “मी कृपाली मी इथे एकटीच रहाते. मी कृष्ण भक्त आहे. माझ या जगात कुणीच नाहीये पण देवाच्या कृपेने मला खुप काही मिळाल आहे. त्याचाच उपयोग करुन मी माझ आयुष्य आत्ता पर्यंत जगत आले बस आता मला कृष्णाच दर्शन घडवेल अस कुणी भेटाव एवढीच एक इच्छा आहे त्याला मग माझ्या कडील सगळ्या शक्ती देउन मी मुक्त होइल. पण ते ही आता होईल अस वाटत नाही मला.”

वेदांगी एक क्षण परत डोळे मिटते. त्याक्षणी तीला समजत ह्या नागदेवींचा पुर्वजन्म आहे. ती त्यांच्या समोर नतमस्तक होते. आणि म्हणते.

वेदांगी (नतमस्तक होत) – “देवी कदाचीत तुम्ही मला ओळखल नाहीत मी वेदांगी. नागदेवींचा म्हणजे तुमचा पुढचा जन्म तुम्हाला भगवान श्री कृष्णाच दर्शन याच जन्मात झाल असत परंतु तुम्ही देवांकडुन पुढच्या जन्मी मला दर्शन द्या अस त्यांच्या कडुन वचन घेतलत त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही नागदेवी असाल तेव्हा दर्शन मिळेल परंतु तीथे ही एक अडचण आहे ती म्हणजे नागदेवी लहान पणीच नागलोक सोडुन धरतीवर आल्या तीथेच मोठया झाल्या आणि त्यांचा मृत्यु देखील धरतीवरच झाला ज्यानी त्यांच पालन पोशण केल पुढे त्यांच्याच घरात परत त्यांनी जन्म घेतला माझ्या रुपात मीच ती वेदांगी. मला तुम्ही वचन दिल्या प्रमाणे या जन्मात श्री कृष्णाच दर्शन घडलय ते तुमच वचन होत जे आज पुर्ण झाल. पण देवी जर स्वथा ही देव तुम्हाला दर्शन द्यायला आले होते तर अस तुम्ही त्यांच्या कडुन वचन का घेतलत.”

हे सगळ ऐकुन देवी कृपाली विचारातच पडतात. त्यांना आपण काय बोलाव तेच समजत नाही त्या आपल देह भान विसरुन जातात.

काही वेळा नंतर...

कृपाली – “म्हणजे माझ स्वप्न देवांनी पुर्ण केल. या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात मला देवानी दर्शन दिल देवी तुम्ही धन्य आहात तुमच्या मुळे आज मला माझ्या स्वप्नाची सत्यता पटली. आता माझ्या साठी आणखी एक कराल मी तुमची कायम ऋणी राहीन. देवी खर तर प्रत्येक गोष्टीची वेळ ही यावी लागते हे सगळे पुर्व जन्मीची कर्म असतात जी प्रत्येक जन्मात आपल्याला भोगावी लागतात कधी चांगल्या रुपात तर कधी वाईट. त्या वेळी मी देखील स्वप्नात अस का म्हणले असेल हे मला ही सांगता येणार नाही कदाचीत ही अशी वेळ येणार असेल.”


वेदांगी नुसत हसते. आणि विचारते.

वेदांगी – “खरय तुमच आपण कधीच सांगु शकत नाही आपल्या पुढे अजुन काय लिहुन ठेवलय ते बरं सांगा तुमची काय इच्छा आहे.”

कृपाली – “मला तो क्षण जेव्हा तुम्ही भगवंताला भेटलात तो क्षण मला दाखउ शकाल. तुमच्या मदतीने ही सही मी दर्शन घेउ शकेल.”

वेदांगी जरा विचार करते तेवढयात एक आकाशवाणी होते.

आकाशवाणी – “तु हे करु शकतेस वेदांगी. देवी कृपालींच्या डोक्यावर हात ठेव आणि दोघ डोळे मिटा.”

वेदांगी आकाश वाणीने सांगीतल्याप्रमाणे कृपालींच्या डोक्यावर हात ठेवते दोघ ही डोळे मिटतात तस देवी कृपालींना यमुना नदीतला प्रसंग जश्याच्या तसा दिसु लागतो त्याना श्री कृष्णाच दर्शन होत.

काही वेळा नंतर...

दोघ आपले डोळे उघडतात...

ते दृश्य बघुन कृपाली खुप सुखावते आनंदीत होते. आणि वेदांगीचे व देवाचे मनापासुन आभार मानते.

कृपाली – “तुम्ही माझी आज खुप मोठी इच्छा पुर्ण केलीत मी तुमचे उपकार कसे फेडू मलाच कळत नाही मी फक्त एवढच करु शकते. आज माझ्या कडील सर्व शक्ती मी तुम्हाला देतीये देवी याचा स्वीकार करा.”

कृपाली आशिर्वाद देते तस तीच्या सगळ्या शक्ती वेदांगी मध्ये येतात. आणि त्याक्षणी वेदांगी सर्वशक्तीमान नागदेवाच्या रुपात प्रगट होते. तीच ते रुप बघुन कृपाली तीच्या समोर नतमस्तक होते नागदेवी वैश्णवी तीला आशिर्वाद देते. तस कृपालीच्या रुपातली यक्षीणी नागदेवी समोर येते आणि नागदेवीला वंदन करुन अंतर्धान होते.

इकडे नागदेवी अपल्या वेदांगीच्या रुपात येते. तस आपोआप पाचव्या दाराची चावी येउन पडते आणि पुन्हा एकदा वेदांगी चा प्रवास सुरू होतो पण या वेळी मात्र युध्दाचा हो एक महा संग्राम...

क्रमश:

Post a Comment

0 Comments