वेदांगीचा आता परतीचा प्रवास सुरू झाला होता. आता वेळ युध्दाची होती एक घमासांग युध्द. ती चावी आपल्या हातात घेते तस आणखी एक दार तीच्या समोर येत ती दाराला चावी लावते आणि अचानक पाचव दार उघडत आणि वेदांगी दारातुन दुस-या दुनियेत प्रवेश करते.
ते ठीकाण म्हणजे विषलोक असतो. हो तोच विषलोक ज्याचा राजा नागराज देवा असतो.
वेदांगी विषलोकात प्रवेश करते. विषलोकाची रचना नागलोका पेक्षा खुप वेगळी असते. तीथले नाग नागीणी देखील वेगळ्या असतात आणि अत्यंत विषधारी असतात.
वेदांगी स्वथ:च नागदेवतेच रुप असल्याने तीला लगेच आपण कुठे पोहोचलो आहोत याचा आभास होतो. म्हणून ती खुप सावध राहुन पुढे जाउ लागते.
वेदांगी एक अवतारी कन्या असते त्यामुळे तीला ते दाहक विष सहन होत नाही तरीही ती पुढे पुढे चालतच रहाते.
काही वेळा नंतर...
खुप चालल्या नंतर ती नागराज देवाच्या राजवाड्या समोर येते.
तो राजवाडा खुपच भयंकर असतो. वेदांगी राजवाडा बघुन जराशी घाबरते पण आता इथुन दुसरा मार्गही नाही ह्या विचाराने निर्धार करुन पुढे सरकते आणि राजवाड्यात प्रवेश करते.
वेदांगी राजवाड्यात प्रवेश करताच विषलोकातील नागांना आपल्या राज्यात शत्रु घुसलाय याचा आभास होतो आणि ते लगेच युध्दासाठी सज्ज होतात.
इकडे...
नागलोकात सुध्दा याचा आभास होतो आणि लगेच नागराज श्रीधर आपल सैन्य घेउन सज्ज होतात.
एकीकडे विषलोकाच सैन्य दुसरी कडे असुरराज भयासुरचे असुरगण आणि एकीकडे नागलोकाचे सैन्य लढाईसाठी सगळे तयार होतात.
पण वेदांगीला मात्र क्षणभर ही याचा आभास झालेला नसतो. ती आपल्यातच मग्न राहुन राजवड्यात फिरत असते.
आणि अशातच विषलोकातील नागांची तीच्या वर नजर पडते ते तीला पकडतात. तेवढ्यात एक झंझावात येतो वादळ सुटत ढग गडगडु लागतात आणि वेदांगी दहा मुखी नागदेवतेच्या रुपात येते तीच ते रुप पाहुन सगळेच जण घाबरु लागतात.
आणि काही क्षणातच एक महा भयंकर युध्द सुरू होत महिने जातात वर्ष जातात. युध्द थांबण्याच नावच घेत नाही वार वर वार होत राहतात तलवारींचा सुर निघत रहातो प्रत्येक जण धारातीर्थी पडतो.
कैक महिन्या नंतर...
नागदेवी वैश्णवी भयासुर आणि नागराज देवाला मारण्यात सफल होतात त्यावेळी तीच रुप चंडीके सारख असत. सहा हातात शस्त्र डोक्यावर सुंदर मुकूट बाहेर काढलेली जीभ आणि वेटोळे घालुन बसलेले नागराज. त्यावेस वैश्णवी साक्षात कालीचे रुपच वाटत होती.
ब-याच वेळा नंतर...
वैश्णवी शांत होते भयासुर आणि देवा चा अंत होतो. व सत्याचा विजय होतो.
इकडे...
युध्दात विजय मिळाल्या नंतर... वैश्णवीला आपला नागलोक परत मिळतो आणि तीच रुप असलेली वेदांगी परत स्वगृही परतते.
वेळ सकाळची...
९ वाजलेले असतात..
वेदांगीच्या खोलीत...
वेदांगी आपले डोळे चोळत चोळत उठते. आणि विचार करु लागते.
“जे आपण पाहिल ते काय होत नागलोक विषलोक खरच होत सगळ कि स्वप्न छे कुठली ही लिंकच लागत नाहीये जाउ दे”
ती मनातुन विचार काढते आणि आपल्या कामाला सुरवात करते.
ईकडे...
नागलोकातुन नागदेवी नागराज श्रीधर आणि वैश्णवी सगळ बघत असतात व एक मेकांकडे बघुन हसतात.
आणि नागशास्त्र पुस्तक व त्याचे मार्ग बंद होतात. व ते पुस्तक परत स्व ठीकाणी पोहोचत एका नवीन व्यक्तीच्या शोधात...
:- थांबा जाताय कुठे अजुन ६वा दरवाजा उघडायचा बाकी आहे पण तो नंतर.. पर्व दुस-या मध्ये नागशास्त्र एक अदभुत गाथा...
0 Comments