चिनु मध्यम वर्गिय घरातली दहा वर्षिय एकुलती एक मुलगी घरात सगळ्यांची लाडकी शाळा अभ्यास आणि खेळ असा तिचा दिनक्रम असायचा चिनु अभ्यासात खुप हुशार होती. आणि खेळातही . मस्ती करण हा जसा काही तिचा सगळ्यात आवडता छंद . चिनु घरात असली की घर अगदी भरल्या सारख वाटायच बडबडया चिनुचा दुसरा आवडता छंद ह्मणजे घरच्यांना मदत करण . एक दिवस चिनुची आई आजारी पडली . दुपारची वेळ होती घरात चिनुची आई झोपलेली असते तेवढ्यात चिनु शाळेतुन घरी येते आणि आईला झोपलेली पाहाते काळजी वाटून आईला विचरते तेव्हा चिनुला आपली आई आजारी असल्याच समजतं चिनु आईच्या कपाळाला हात लाऊन बघते तेव्हा ती खुप घाबरते आणि लगेच डॉक्टरांना आणि बाबांना कॉल करते काहिवेळा नंतर चिनुचे बाबा आणि डॉक्टर घरी येतात डॉक्टर चिनुच्या आईला तपासात . आणि चिनुच्या बाबांना सांगतात .
" बर झाल ! चिनुनी वेळेवर फोन केला नाहीतर वहिनींची तब्येत बिघडली असती . शाब्बास बेटा मी काही गोळ्या लिहुन देतो त्या सकाळ संध्याकाळ चार दिवस द्या म्हणजे बर वाटेल "
चिनु मेडीकल मधुन गोळ्या आणते आणि आईला देते. चिनुच्या समय सुचकतेमुळे चिनुच्या आईची तब्येत ठिक होते.
तात्पर्य :- लहान मुलांनी नेहमी आपल्या आई बाबांची काळजी घेतली पाहीजे
0 Comments