काही वेळा नंतर...
यमुना नदी काठी...
वेदांगी नदी जवळ येते नदी खुप खोल असते त्यामुळे ती जरा विचारातच पडते तेवढ्यात आतुन एक आवाज येतो.
अनोळखी आवाज – “वेदांगी ये आत ये, मी तुझीच वाट पहात आहे. तुझी एक वस्तु आहे माझ्या कडे कित्येक वर्षांपासुन मी त्याची रक्षा करत आहे आता तुझी पाळी आहे आत ये आणि या मौल्यवान वस्तुच्या जबाबदारी तुन मला मुक्त कर.”
वेदांगी – “आपण कोण आहात मला सांगाल का तुम्ही मला कस ओळखता”
अनोळखी आवाज – “तु अजुनही मला ओळखल नाहीस मी तुझ्या साठी निरोप पाठवला होता न विसरलीस का”
हे ऐकताच वेदांगी चक्क चक्राउनच जाते कारण तीच्याशी साक्षात भगवान श्री कृश्ण बोलत असतात. तीला आपण काय बोलाव तेच समजत नाही. ती भगवान श्री कृश्णाना म्हणते.
वेदांगी – “साक्षात भगवान श्री कृश्ण बोलत आहेत. (थोड थांबुन) मी काय बोलु तेच समजत नाही देवा मला. माझी थोर पुण्याई की मला हे भाग्य मिळाल.”
भगवान श्री कृश्ण हसतात. तस नदी दुभंगते आणि एक रस्ता तयार होतो. भगवान श्री कृश्ण वेदांगीला म्हणतात.
भगवान श्री कृश्ण – “ये बाळ तुझ स्वागत आहे. ये”
वेदांगी यमुना नदीत उतरते. तस नागदेवतेच दर्शन घेण्यासठी स्वथा यमुना नदी देवीच्या रुपात प्रगट होतात आणि वेदांगीच्या रुपातील वैश्णवीला वंदन करतात व गुप्त होतात वेदांगी अधांतरी नदीत जायला लागते सगळी कडे पाणीच पाणी असत वेदांगी स्वथाला सावरत सावरत नदीत जाते तस मासे तीच दर्शन घेण्यास गर्दी करायला लागतात तीच्या आजु बाजुल घेराव घालु लागतात तरी ही ती त्या वातावरणाचा आनंद घेत पुढे जात रहाते. खुप चालल्या नंतर.
अचानक तीची नजर एका प्रकाशमय जागेकडे जाते तो प्रकाश बघुन तीचे तर डोळेच दिपुन जातात त्या प्रकाशाकडे ती एक क्षण बघुच शकत नाही काही वेळा नंतर आपले डोळे पुसत पुसत वेदांगी त्या प्रकाशाकडे निरखुन बघते तर काय तो प्रकाश साक्षात श्री कृश्ण भगवानांचा असतो वेदांगी बराच वेळ त्यांच्या कडे नुसत बघतच असते आपल्या डोळ्यांमध्ये त्यांच रुप साठउन घेत असते.
ब-याच वेळा नंतर...
वेदांगी भानावर येत म्हणते.
वेदांगी – “देवा काय रे हे, आम्ही मंदीरात सर्वत्र तुझे जे रुप बघतो तो तुच का राधेचा कृश्ण, सुदामाचा मित्र यशोदाचा कान्हा, आवर आवर तुझ हे रुप मी पाहु शकत नाहीये पण तरी आज मी धन्य झाले तुझे दर्शन घेउन तु साक्षात देव सृष्टीचा रचेता आणि माझी वाट पहात होतास खर तर ही माझी पुण्याईच आहे. मी आज तुझ्या सामोर नतमस्तक आहे देवा.”
वेदांगीच्या डोळ्यातुन घळा घळा पाणी येत असत. श्री कृश्ण स्वथा तीला उठवतात आणि म्हणतात.
श्री कृश्ण – “उठ बाळा अग तुही कलीयुगातील अवतारच आहेस हे कलीयुग अस आहे ज्यामध्ये आम्ही देवतेच्याच रुपात येउ शकत नाही म्हणूनच तर आम्हाला अवतार घ्यावे लागतात. तुला माहीत आहे. सांग बर माझे मोठे बंधु हे नेमक कोण आहेत. सांगीतल असेल न तुला आजीनी तुला तर आजीनी खुप गोष्टी सांगीतल्या आहेत न.”
वेदांगी विचार करु लागते तस तीला एकदम आठवत.
वेदांगी – “अं... नागराज शेशनाग बरोबर न.”
श्री कृष्ण – “अगदी बरोबर. जस देवी देवतांना अवतार घेउन काम कराव लागत तसाच हा तुझा एक अवतारच आहे. तु म्हणजे वैश्णवी नागराज कालीयांची वंशज आहेस तुझ हे आत्ताच म्हणजे कलीयुगातल रुप पण खरी तु तर वैश्णवीच आहेस न. एक गोष्ट कायम लक्षात ठेव बेटा प्रत्येक गोष्ट ही आधीच ठरलेली असते आपण कुणी ही असो त्यात हस्तक्षेप कधीच करु शकत नाही आता आणखी एक रहस्य सांगु तुला.”
वेदांगी – “आणखी एक रहस्य? या रहस्या नंतर अजुन ही काही आहे देवा.”
श्री कृष्ण परत हसतात व म्हणतात.
श्री कृष्ण – “वेदांगी हे जग इतक्या रहस्यांनी भरलेल आहे याचा तर आपण विचार देखील करू शकत नाही. आता मी जे सांगतो ते नीट ऐक. नागदेवी वैश्णवी च्या पुर्वजन्मी वैश्णवीने माझ्या कडून वचन घेतल होत की माझ्या पुढच्या जन्मी मला तु दर्शन देशील परंतु काही कारणाने ते वचन पुर्ण होउ शकल नाही म्हणून या वेळी इथे मी तुला त्या वचन पुर्ती साठी दर्शन देण्यास थांबलो. आता कळाल तुला प्रत्येकाची वेळ ही यावी लागते तेव्हाच होतात सगळ्या गोष्टी.”
वेदांगी सगळ काही न समजल्या सारख एकत असते आणि विचार करु लागते.
“नागदेवी वैश्णवी यांचा पुढील जन्म हा आपण आणि त्यांचा ही कुणी पुर्व जन्म होता. सगळच डोक्यावरुन जात आहे.”
वेदांगी काय विचार करतीये हे श्री कृष्ण भगवानांना कळत होत ते वेदांगीला म्हणतात.
श्री कृष्ण – “इतका विचार करु नकोस तुला ही समजेल सगळ. वेळ तर येउ देत अजुन ३ मार्ग बाकी आहेत न तुझे पहिले तीन तर अगदी सहज तेने पुर्ण केलेस न तु मग हे ही करशील नक्की. माझा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे शुभं भवतु.”
एवढ बोलुन श्री कृष्ण अंतर्धान पावतात. वेदांगी त्यांना हात जोडुन नमस्कार करते. तेवढ्यात तीला काही तरी चमकताना दिसत ती जवळ जाउन बघते तर तीचे एकदम डोळे चमकतात. ती निरखुन बघते आणि बघतच रहाते कारण तो नागमणी असतो. वेदांगी नागमणी कडे एकटक बघतच रहाते. आणि हळुच हातात घेते तस तीला एक दृश्य दिसत ते असत कालीया नागराज यांच वेदांगीला गुरुजींचा नागराजांच्या रुपात भास होतो आणि काही क्षणात ते दृश्य निघुन जात ती विचार करते.
“छे.. छे अस कस होउ शकेल गुरूजी नागदेवता कसे असतील.”
ती एकदा परत मणीकडे बघते आणि आपल्या जवळ ठेउन घेते तस चौथ्या दरवाज्याची चावी देखील तीच्या समोर येउन पडते. वेदांगी चावी उचलते तेवढ्यात एक जोराचा आवाज येतो आणि तीच्या समोर एक दार प्रगट होत. वेदांगी दाराला चावी लावते तस ते दार आपोआप उघडत आणि वेदांगीची आणखी एक सफर सुरू होते.
क्रमश:
0 Comments