वेदांगी आपल्या हातात चावी घेते आणि तिसर दार उघडते. तस ती वृदांवनात पोहोचते. आणि आपल्या आजुबाजुला एक नजर फिरवते. तीथल भक्तीमय वातावरण बघुन ती मनातुन हरवुन जाते. वेदांगीचा हा प्रवास देखील भक्तीमय प्रवास होणार असतो. वेदांगी तीथल्या काही भक्तांना भेटते. आणि त्यांच्याशी गप्पा ही मारते.
वेदांगी – “नमस्कार, मी वेदांगी एका प्रोजेक्टवर काम करत आहे. आपण इथलेच का?”
अनोळख व्यक्ती – “हो, मी इथलाच आहे.”
वेदांगी – “ आणि तुम्ही?”
दुसरी व्यक्ती – “मी एक पर्यटक आहे वृदांवन बघायला आलो आहे.”
वेदांगी – “आत्ता पर्यंत काय काय बघीतल मग?”
तीच व्यक्ती – “सगळीच मंदीरे तिर्थक्षेत्र. जस बांके बीहारी मंदीर हे मंदीर वृंदावन वासियांसाठी सर्वात महत्वाच आहे. तसच राधा रमण मंदीर, इस्कॉन वृंदावन मंदीर श्री रंगनाथ प्रेम मंदीर कात्यायनी मंदीर इ. आता मी गोकुळ नगरी बघायला निघालो आहे.”
वेदांगी – “इथला तुमचा अनुभव कसा होता?”
तीच व्यक्ती – “खुपच सुंदर इथे आल्या नंतर कोणी ही असो तो भक्तीमय रंगात रंगल्या शिवाय रहात नाही. मला वाटत तुम्ही ईथे पहिल्यांदाच येत आहात.”
वेदांगी – “हो.”
तीच व्यक्ती – “मग ईथली मंदीरे बघाच. काय माहीत तुम्हाला तुम्ही ईछीलेल मिळेल.”
वेदांगी हे ऐकल्यावर विचारातच पडते. “मी काय ईछीलेल आहे हे यांना कस माहीत हे अस का म्हणले असतील. हा मला मिळालेला कुठला संकेत तर नाही.” अस विचार करुन वर बघते तर दोघ ही गायब झालेले असतात. वेदांगी श्री कृश्णाला मना पासुन नमस्कार करते. आणि वृंदावनाची मंदीरे बघायला निघुन जाते.
काही वेळा नंतर...
फिरता फिरता वेदांगी बांके बिहारी मंदीरा जवळ पोहोचते. मंदीर बघुन वेदांगी तर एकदम मंत्रमुग्धच होते काही क्षण बाहेरुन दर्शन घेतल्यावर ती मंदीरात जाते. मंदीराचा पडदा उघडताच वेदांगी बांके बिहारी च दर्शन घेते त्यांच ते रुप पाहुन वेदांगी त्यांच्या रुपात अगदी हरउन जाते. काही क्षणात त्यांना लाडुचा प्रसाद चढउन बाहेर येते.
दर्शन घेउन बाहेर सभामंडपात येउन बसते बांके बिहारीच ते रुप तीच्या डोळ्या समोरुन जातच नाही वेदांगी तीथेच जरावेळ ध्यानस्थ बसते. आणि गुरूजींनी दिलेल्या मंत्राचा जप ही करते जस ती ध्यानस्थ बसते तस तीला ध्यानात श्रीकृश्ण भगवान आणि कालीया नागाच एक दृष्य दिसु लागत. वेदांगी ते दृष्य अगदी निरखुन बघु लागते ती स्वथाला युध्दाच्या ठीकाणी पाहु लागते त्याचा अनुभव घेउ लागते आणि ते दृष्य आपल्या डोळ्यात भरभरुन साठवते आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने हळुहळु आपले डोळे उघडते. तीच्या मनात एक विचार येतो. “आत्ताच मला ध्यानात हे दृष्य का दिसल नेमक काय अर्थ असेल याचा.” ती विचार करतच असते की तीच्या समोर एक साधु येतात आणि म्हणतात.
साधु – “तु वेदांगी आहेस न?”
साधुचा प्रश्न ऐकुन वेदांगीला आश्च-याचा धक्काच बसतो. परत ती विचारात पडते. “ज्या व्यक्तीला आपण आज पर्यंत उभ्या आयुष्या कधी भेटलो नाही त्याला माझ नाव कस माहीत.” ती विचारच करत असते तेवढ्यात भानावर येउन ती साधुंना विचारते.
वेदांगी – “महाराज आपण कोण आहात आणि मला कस ओळखता?”
साधु – “मी एक कृश्ण भक्त आहे. मी पहिले हिमालयात वस्तव्यास होतो. तीथे असताना एकदा मला साक्षात्कार झाला आणि स्वथा बाके बिहारी नी मला इथे बोलाउन घेतल आणि सांगितल तु वृंदावनात बांके बिहारी मंदीरात ये तीथे तुला वेदांगी नावाची एक योध्दा भेटेल तीला माझा निरोप सांग मी तुझी यमुना नदीत वाट पहात आहे. मला येउन भेट. तु तीच वेदांगी आहे न?”
साधुच बोलण एकुन एक क्षण वेदांगीला आपण काय बोलाव तेच सुचत नाही ती मनात म्हणते.
वेदांगी (मनात) – “मी किती भाग्यवान आहे. साक्षात भगवान श्रीकृश्णांचा मला निरोप यावा”
ती मनोमन कृश्णाला नमन करते आणि साधुना म्हणते.
वेदांगी – “देवांची ही कुठली लीला आहे माहीत नाही पण हो ती भाग्यवान मीच आहे. तुमचे मनोमन आभार”
अस म्हणत ती साधुंच्या पाया पडते साधु तीच्या डोक्यावर हात ठेवतात तस ते साधु अदृश्य होतात. ती त्यांना सगळी कडे शोधते पण त्या साधुंना ना कोणी बघीतलेल असत ना कोणी त्यांच्याशी कधी बोललेल असत. ती सर्वांना त्यांच वर्णन करुन सांगते पण सगळे एकच वाक्य बोलतात “इथे अश्या वर्णनाच कोणीच नाही” शेवटी ती मनात विचार करते “कदाचीत कुणी तरी अवतार असेल जे फक्त मला मतद करायला आले असतील”
असा विचार करुन ती मनोमन त्यांचे आभार मानते. आणि यमुना नदी कडे रवाना होते.
वेदांगी मंदीरा पासुन काही अंतरच दुर गेली असेल तस तीच्या मागे चित्र विचीत्र तोंड असलेली असुरांची एक सेना लागते तीला त्याचा आभास होतो आणि ती मागे वळून बघते तर ती लगेच देवाचा धावा सुरू करते आणि क्षणार्धात तीच्या शक्ती जागृत होतात ती एक विशाल काय नाग देवीच्या रुपात प्रगट होते. तीची आयुधे ही प्रगट होतात. त्या क्षणी ती दुर्गा माते सारखी भासत होती तीच ते रुप पाहुन सगळेच अचंबीत होतात हे सगळ काय सुरू आहे येचा प्रत्येक जण विचार करत असतो. कोणी तीला देवीचा अवतार समजत असतो तर कोणी तीच्या समोर हात जोडून नत मस्तक होत असतो. पण प्रत्येकाच्या मनात मात्र एकच प्रश्न असतो. “ही नेमकी कोण आहे कुठली अवतारी शक्ती तर नाही.” प्रत्येकजण एकाच विचारात असतात आणि तेवढ्यात वृंदावनाच्या पावन धरती वर एकच हाहाकार उडतो आणि क्षणात एक महा भयंकर युध्द सुरू होत. आणि बघता बघता युध्दाच एक संग्रामात रुपांतर होत. सेना येत जाते आणि वेदांगी लढत जाते.
होता होता बराच वेळ युध्द होत हजारो असुर धारातीर्थी पडतात. आणि बाकीचे तीच ते भयंकर रुप पाहुन अचानक अदृश्य होतात.
आणि वेदांगी आपल रागातल रुप आवरत घेते व पुर्ववत होते. ती आपल्या उजव्या हाताने सगळ्यांना आशिर्वाद देते तस सगळे बघीतलेल विसरुन जातात आणि आपापल्या कामावर निघुन जातात.
वेदांगी यमुना नदीकडे प्रस्थान करते.
क्रमश:
0 Comments