दार उघडताच वेदांगी आपल्या पुर्वजन्मीच्या म्हणजेच वैश्णवीच्या राजमहाला समोर प्रगटते. ती स्वथाला एका लहान मुली समोर उभी असलेली बघते. ती लहान मुलगी म्हणजे दुसरी तीसरी कुणी नसुन नागदेवी वैश्णवीच असते.
नागदेवी वैश्णवी वेदांगीला लगेच ओळखते भविष्यातल तीच ते रुप पाहुन तीला खुप आनंद होतो ती वेदांगीला म्हणते.
नागदेवी वैश्णवी – “तुम्ही भविष्यातल माझ रुप वेदांगी आहात न. तुमच नागलोकात स्वागत आहे. बोला मी तुमची काय मदत करु शकते.”
वेदांगी आपल पुर्वजन्मीच रुप बघुन अचंबीत होते. ती नागदेवीला विचारते.
वेदांगी – “तुम्ही नागदेवी वैश्णवी आहात? खुप छान वाटल तुम्हाला भेटुन”
नागदेवी वैश्णवी – “आम्हाला सुध्दा आमच्या भविष्यातल्या या रुपाला भेटुन खुप छान वाटल तुमची पहिली कामगीरी आली आहे आमच्या कानावर”
वेदांगी – “धन्यवाद. मी तुम्हाला एक विचारु का?”
नागदेवी वैश्णवी – “या पहिले महालात या नागमाता व पिताश्री ना तर आधी भेटा मग बोलुत सविस्तर”
दोघी राजमहालात पोहोचतात. नागराज श्रीधर नागमाता वेदांगीची वाटच पहात असतात. ते तीला म्हणतात.
नागराज श्रीधर – “मग वेदांगी बेटा तुम्हाला कस वाटल प्रत्यक्ष इथे येउन.”
वेदांगी – “खुप छान तुमची देखील परत ईथे भेट झाली खुप छान वाटल. पण नागदेव माझा ईथे येण्याचा मला उदेश नाही समजला नागशास्त्र मला नेमक काय सांगत आहे.”
नागराज – “पहिल्या दरवाजाच्या वेळी सुध्दा तुम्हाला कुठे माहीत होत. तुम्ही जस जस जात गेलात तस तस रस्ते तुम्हाला मिळत गेले न. ईथे तुम्ही पोहोचला आहात म्हणजे यामागे सुध्दा काही तरी असणारच हो की नाही हे आता तुम्हाला शोधायच आहे.”
वेदांगी विचार करु लागते.
काही क्षणानंतर...
वेदांगी – “नागदेवी वैश्णवी आपण मला यात नक्कीच मदत करु शकता मला तुमच्या मृत्यु बदृल काही सांगु शकाल.”
नागदेवी वैश्णवी – “माझ्या बद्दल तुम्हाला बर्याच गोष्टी माहीत आहेत. जेव्हा मी पृथ्वीच्या ओढीने कुणाला ही न सांगता पृथ्वीवर गेले तेव्हा या नागलोकाच नागशास्त्र देखील घेउन गेले. पण जेव्हा मला सत्याचा आभास झाला तेव्हा मात्र मी नागशास्त्र स्वथा जवळ ठेउन आपला जीव वाचउ लागले. त्याच दरम्यान तुमच्या पणजोबांनी माझा जीव वाचवला व तुमच्या घरात मी तुमच्या आजोबांची धाकटी बहीण बनुन नांदु लागले. सगळे समजायचे माझ्यात काही तरी विलक्षण आहे म्हणून माझे सगळी रहस्य मी दादाला सांगु लागले. मी दादाला हे ही सांगीतल होत की जेव्हा तुमच्या घरात वेदांगी नावाने मी परत जन्म घेईन तेव्हा ही रहस्य वेदांगीला सांगा तो पर्यंत ही डायरी कुणाच्या ही हाती लागता कामा नये. होता होता आम्ही मोठे झालो आणि एक दिवस मी महादेवांची पुजा करायला मंदीरात आलेली असताना मी नागदेवीच्या रुपात असताना कुणी तरी माझ्यावर वार केला आणि तीथेच माझा प्राण गेला पण ती व्यक्ती कोण होती समजल नाही.”
वेदांगी विचारात पडते. आणि म्हणते
वेदांगी – “तुम्ही तर तेच सांगीतलत जे पहिलेच मला माहित होत. पण त्यातले त्यात एवढ तर कळाल की तुमचा मृत्यु मंदीरा जवळ झाला (थोडस विचार करुन) म्हणजे आता फक्त त्या व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे. हं”
नागदेवी वैश्णवी – “आता तुम्हाला त्याचा शोध घ्यायचा आहे. मी तुम्हाला काही शक्ती देखील प्रदान करते ज्याचा तुम्हाला पुढे उपयोग होईल. आपले डोळे मिटुन हात जोडा.”
वेदांगी डोळे मिटते. व आपले हात जोडते.
तस नागदेवी वैश्णवी आपला उजवा हात उंचाउन तीला आर्शिवाद देतात तस त्यांच्या हातातुन एक प्रकाश बाहेर येतो आणि वेदांगीला शक्ती मिळते. त्या शक्तीमुळे तीला आत्मज्ञान व्हायला लागत मंदीरा जवळ काय घडल होत ती प्रत्येक घटना तीला स्पष्ट दिसु लागते.
काही वेळा नंतर....
वेदांगी आपले डोळे उघडते आणि सगळ्यांना बघीतलेल सांगायला सुरवात करते.
वेदांगी – “तुमचे मनापासुन आभार मला तुम्ही शक्ती प्रदान केलीत. आज जे काही मी या शक्ती मुळे बघीतल आहे त्या मुळे माझ्या अंगाचा थरकाप उडाला आहे. आणि मला हे कळत नाही आहे हे मी तुम्हाला कस सांगु. नागदेव तुम्ही तर महादेव भोलेनाथ यांचे भक्त न अस म्हणतात जर एखाद्या चुकीला सच्च्या मनाने माफ केल तर माफ करणारी व्यक्ती मानाने मोठी ठरते. आणि तुम्ही तर नागदेव आहात तुम्ही माफ नाही करणार का.”
नागराज जरा विचारात पडतात.
नागराज – “तुम्ही नेमक कुणा बद्दल बोलत आहात काय पाहिल तुम्ही डोळे बंद असताना.”
वेदांगी विचार करु लागते.
काही क्षणा नंतर....
वेदांगी – “नागदेव, आज मी ज्या व्यक्ती बद्दल सांगणार आहे त्यांच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. पण कृपया तूमचा राग माझ्या कुटूंबा वर काढु नका.”
नागराज आता आणखीनच विचारात पडतात आणि म्हणतात.
नागराज श्रीधर – “तुम्हाला अस का वाटल की आम्ही आमचा राग काढु जस हे कुटूंब आहे आमच तस तुमच कुटूंब ही आमच च आहे होय न सांगा निशंकोच पणे सांगा.”
वेदांगी – “नागदेव, नागदेवी वैश्णवीच्या मृत्युचे कारण दुसर कुणी नसुन माझे आजोबाच होते.”
सगळे एकदम शांत होतात ज्यांना आपल मानल त्यांनीच घात केला ह्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. आणि सगळीकडे एकच शांतता पसरते...
काही वेळा नंतर...
नागराज श्रीधर – “बेटा तु तर आम्हाला धर्म संकटात टाकलस कस हे विसरु शकतो आम्ही त्या वेळेस आमची काय अवस्था झाली होती ते तुला नाही समजणार.”
तेवढ्यात वैश्णवी बोलु लागते.
वैश्णवी – “पिताश्री तुम्ही विसरताए वेदांगी माझच एक रुप आहे. माझा मृत्यु दादाच्या हातुन होईल हे आधीच ठरल होत आपण याला कसे अपवाद राहुत. अहो भगवांना ही मरण चुकल नव्हत आपण तर एक उपासक आहोत जर सोडल तर ते घर दुसर स्वर्ग होत.”
वेदांगीच्या डोळ्यातुन पाणी येत. ते बघुन वैश्णवी म्हणते.
वैश्णवी (डोळे पुसत) – “तुम्हाला वाईट वाटुन घेण्याच कारण नाही आहे. हे घडणारच होत घडुन गेल. अजुन तर तुम्हाला खुप कठीण प्रसंगांना सामोर जायच आहे. मला विश्वास आहे तुम्ही ते नक्कीच करुन दाखवाल. थोड आठवा बर नागराज कालीया यांचा शोध, त्यांचा नागमणी, देवा आणि असुर राज भयासुर यांचा वध, या बरोबरच तुमच काय काम होत.”
वेदांगी आठउ लागते.
काही क्षणा नंतर...
वेदांगी (वैश्णवी कडे बघत) – “तुमच्या मृत्युचे कारण शोधणे”
ती विचारातच पडते तीला समजत नेमका नागलोकात येण्याचा तीचा उद्देश्श काय होता. ती विचार करतच असते की तीच्या समोर तिस-या दरवाज्याची चावी येउन पडते. तस सगळे एकमेकांकडे बघु लागतात.
क्रमश:
0 Comments