नागशास्त्र एक अद्भुत गाथा (भाग - एकविसावा )


वेदांगी आणि सुवव्रत महालात प्रवेश करुन येणा-या लोकांमध्ये मिसळुन जातात. व राणी विशेलीचा महाल बघण्यात मग्न होतात. दोघ ही लपत लपत महालाचा एक एक कोना निट निरखुन बघत असतात. राणीच्या महालाची एक वेगळीच रचना केली गेलेली होती त्यामुळे तो महाल एक भुल भुलैय्या सारखा वाटत होता. तरी सुध्दा दोघ महाल नीट बघते प्रत्येक खोली नीट चेक करत होते. पण त्यांच लोकांकडे सुध्दा लक्ष होत आपल्या वर कुणी पाळत तर ठेवत नाही न हे ही दोघ जातीने बघत होते. आणि महाल बघता बघता वेदांगी एका विचीत्र अश्या खोलीत जाते. ती खोली खुपच विचीत्र असते तीथली प्रत्येक गोष्ट विचीत्र असते. तीला समजत ही खोली नक्कीच राणी विशेलीची आहे ती खोलीत प्रवेश करते. आणि जादुई दांडु शोधु लागते. कारण विशेलीची सगळी शक्ती त्या दांडु मध्ये असते जर तो दांडु तीच्या पसुन बाजुला झाला तर ती शक्तीहीन होणार असते. त्यामुळे तीला मारण ही शक्य होणार असत.

म्हणून तीची दांडुची शोधा शोध सुरू असते.

शेवटी तीला एक शस्त्र सापडत ती त्याला नीट निरखुन बघते तर तो जादुई दांडु असतो. वेदांगी त्याला हातात घेताच तो दांडु एकदम चमकु लागतो. त्या प्रकाशाने जणु ती पुर्ण खोली प्रकाशमान होते. आणि तीच्या नुसत स्पर्श करण्याने त्या दांडुत जीव निर्माण होतो. वेदांगीने दांडु मिळवलेला असतो. आता तिच्या समोर प्रश्न उभा असतो विशेलीच्या अंताचा. विशेलीला विश देउन कस मारायच याच विचारात आता वेदांगी असते. तेवढ्यात तीच्या हातावर काही तरी पडत तस ती आपला हात एकदम झटकते आणि अचानक सुवव्रत गायब होतो. दांडुच्या जादुने सुवव्रत अदृश्य होतो आणि वेदांगीला दांडुच्या जादुची महीमा समजते. तीला एक कल्पना सुचते ती परत एकदा दांडु झटकते व सुवव्रतला पहिल्या सारख करते. आणि त्याला आपली कल्पना सांगते.



वेदांगी – “रक्षक जी मला एक कल्पना सुचली आहे. आपण या दांडुचा उपयोग करुन विशेलीचा अंत केला तर. म्हणजे अदृश्य होउन.”

सुवव्रतला वेदांगीची कल्पना आवडते तो तीला म्हणतो.

सुवव्रत – “तुमची कल्पना खुपच छान आहे नागमाता. आपण असच करुत त्यामुळे विशेलीला आपल खर रुप ही दिसणार नाही आणि आपण अगदी सहजतेने तीचा अंत करु शकु.”

वेदांगी लगेच स्वथ:वर आणि सुवव्रत वर दांडु झटकते तस दोघ अदृश्य होतात. आणि योग्य संधीची वाट पाहु लागतात.

काही वेळा नंतर...

वेदांगीला ती संधी मिळते आलीशान महाल लोकांच्या गर्दीने भरलेला असतो. मखमली भरजरी पोशाख चढवलेली प्रत्येक जण लोक अगदी राजे महाराजां सारखी वाटत असतात एक आगळा वेगळा थाट असतो प्रत्येकाचा पण ती लोक राजा महाराजा नसतात तर ती लोक सैतानाचे पुजारी असतात विशधारी असतात आणि आज एका खास पुजेसाठी सगळी ती लोक जमलेली असतात. सैतानाची पुजा विधी सुरू असतात प्रत्येकाच्या हातात मद्याने भरलेले पेले असतात प्रत्येक जण विशेलीची वाट पहात असतो.

आणि छान उंची पेहराव करुन विशेली राजदरबारात येते. तिला बघताच प्रत्येक जण आपापल्यात कुजबुज करु लागतो. आणि विशेली लगेच आपला मद्याचा पेला वर करुन सगळ्यांना शांत करते. व एक ठीकाणी पेला ठेउन सगळ्यांच स्वागत करायला राजगादी वरुन खाली येते.

तस वेदांगी अदृश्य रुपात तीच्या पेल्या जवळ जाउन हळुच तीच्या पेल्यात विशआमृताचे थेंब टाकते. आणि सिंव्हासना वरुन खाली येउन विशेली तीचा पेली उचलण्याची वाट पहाते.

काही वेळा नंतर...

सगळ्यांना आपल्या जागेवर बसायला सांगुन विशेली परत आपल्या जागी येते आणि मद्याचा ग्लास हातात घेउन पिउ लागते.

काही क्षणा नंतर...

एक घोट घेताच विशेलीला कस तरी होउ लागत. आणि अचानक ती धारातीर्थी पडते.

जशी ती जमीनीवर पडते सगळा अंधार दुर होतो तीची काळी जादु संपुष्टात येते आणि एक नव चैतन्य निर्माण होत. तीच्या जादु मुळे ज्या ज्या लोकांना त्रास झालेला असतो ते परत पुर्ववत होतात. त्यामध्ये जादुगर सुखदेव देखील होते. जस विशेलीचा अंत होतो तस जादुगर सुखदेवना आपल्या सगळ्या शक्ती परत मिळतात. आणि जंगलाच्या सगळ्या रक्षकांच प्राण्यांच माणसात रुपांतर होत.


ते बघुन सगळे वेदांगीचा जयजयकार करतात. वेदांगी रक्षक सुवव्रत ला राजसिहासना वर बसवते. तेवढ्यात एक आकाशवाणी होते.

“नागमाते आता आपण पुढचा प्रवास करण्यास सज्ज आहात. आपले इथले काम संपले आहे. आता तुम्ही पुढचा प्रवासास निघावे.”

हे ऐकताच सगळ्या लोकांना गहीवरत ते वेदांगीचा सत्कार करतात आपापल्या परीने तीला भेट वस्त देतात त्याच क्षणी तीथे जादुगर सुखदेव देखील येतो आणि भेट म्हणून वेदांगीला एक जादुई खंजर बहाल करतो आणि म्हणतो.

जादुगर सुखदेव – “नागमाता, तुम्ही आमच्या सर्वांचे प्राण वाचवलेत तुम्ही नसता तर आम्ही अजुन किती काळ असेच राहिलो असतो सांगताच येत नाही तुम्ही होता म्हणून आज आम्ही सर्व आहोत. म्हणून आमच्या सर्वांकडून ही एक छोटीशी भेट मला तुम्हाला बहाल करावीशी वाटली मला आशा आहे तुम्ही याचा जरुर स्वीकार कराल.”

वेदांगी – “मी जे केल ते माझ कर्तव्य होत मी ही भेट कशी घेउ शकते आधीच सगळ्यांनी खुप काही दिलय मला आणि त्या हुन ही महत्वाच म्हणजे मी तुम्हा सर्वांना मदत करु शकले त्याच समाधान आपल्या बरोबर घेउन जातीये. तुम्हाला द्यायचच असेल तर तुमचा आर्शिवाद द्या जो सदैव माझ्या पाठीशी राहील.”

जादुगर सुखदेव हसतात आणि म्हणतात.

जादुगर सुखदेव(हसुन) – “अहो, नागमाता मी काय आर्शिवाद देणार तुम्हाला अहो तुम्ह जगत उध्दारक आहात पापनाशिनी आहात ही धरती तुमच्या मुळे पापमुक्त होणार आहे. तुम्ही देवी आहात तुमचाच आमच्या मस्तकावर आपला हात सदैव राहु द्यात हीच आता एक इछा आहे.”

वेदांगी(हसुन) – “सुखदेव जी, अहो मी नागकन्या आहे पुर्वजन्मीची ह्या जन्मात वेदांगी आहे. आणि आज जे काम मी हाती घेतलय मला तुमच्या सगळ्यांच्याच आर्शिवादाची गरज आहे. तुम्ही सर्वानी जे मला प्रेम दिलत त्या बद्दल खुप आभार.”

सगळे वेदांगीला आर्शिवाद देतात सुखदेव तीला जादुई खंजर भेट म्हणून देतात. तेवढ्यात तीच्या हातात एक चावी येउन पडते. तस एक जोराचा आवाज होतो. आणि अचानक तीला एक समोर दरवाजा दिसतो. ती त्या दरवाज्याच्या कुलूपाला चावी लावते तस दार उघडत. आणि वेदांगी पुढच्या प्रवासास सुरवात करते.
क्रमश:

Post a Comment

0 Comments