नागशास्त्र एक अद्भुत गाथा (भाग - विसावा )


दोघ ही जंगलाच्या रस्त्याने जात असतात. सगळीकडे किरर्र अंधार असतो मधूनच चित्र विचीत्र आवाज कानी ऐकु येत असतात पण तसच दोघ हिमतीने पुढे जात असतात. काही अंतर चालल्यावर मागून दोघांना कुणी तरी आवाज देत आहे असा भास होतो. ती दोघ ही मागे वळून पहाणारच असतात. की वेदांगी म्हणते.

वेदांगी – “थांबा मागे वळून बघु नका हे काही तरी भलतच असु शकत. आपण मागे वळून बघीतल आणि आपल्या समोर विशेलीचे कुणी पहारेकरी असतील तर सरळ चालत रहा.”

सुवव्रतच्या एकदम लक्षात येत आणि दोघ ही मागे वळून न पाहता तसच पुढे चालत राहतात.

काही वेळा नंतर...

रात्रीची वेळ असते. चालुन चालुन दोघ ही थकलेले असतात. म्हणून झाडाच्या आडोशाला रात्र काढुन मग पुढचा प्रवास करावा असा विचार करुन दोघ एका झाडा खाली आराम करतात. दोघांना ही थकल्या मुळे लगेच झोप लागते. त्याच झाडाच्या डोलीत एक विशालकाय राक्षसी पक्षी कैक वर्षांपासुन वास्तव्यास असतो. त्याला लगेच समजत या झाडाखाली पहिल्यांदा कुणी तरी चांगली व्यक्ती आलेली आहे. तो पक्षीराज विचार करतो. “आपण यांच रक्षण करायला हव. या जंगलात सगळीकडे विशेलीची सेना आहे.” असा विचार करुन पक्षीराज एकदम डोलीतुन बाहेर येतो. तस तो त्याचा कर्णकर्कश आवाज ऐकुन दोघ ही एकदम जागे होतात. आणि समोर बघतात तर काय समोर विशालकाय पक्षीराज दत्त म्हणून उभा असतो.



त्याला बघून वेदांगीच अचानक रुप बदलायला लागत आणि ती न घाबरता आपला त्रीशुल बाहेर काढते. वेदांगीच ते रुप बघून त्याच क्षणी पक्षीराज तीच्या समोर नतमस्तक होतो. आणि म्हणतो.

पक्षीराज – “नागमाते, आपण आलात या संसाराला या जंगलाला वाचवायला आपण आलात? मी आपले दर्शन घेउन धन्य झालो. गेले कित्येक वर्षां पासुन या प्रतिक्षेत होतो कधी तरी आपले दर्शन होइल माझ्या सगळ्या पिढ्या आपली वाट पाहुन इथेच मरण पवल्या आता एकटा मीच आहे. नागमाते आपण आमच्या सगळ्यांच्याच उध्दारकर्त्या आहात तुम्ही दैवी शक्ती आहात तुम्ही एक ना एक दिवस इथे याल याच आशेने मी तुमची आतुरतेने वाट पहात होतो आज तुमचे दर्शन झाले मी धन्य झालो.”

पक्षीराजच बोलण ऐकुन वेदांगी शांत होते. पक्षीराजच बोलण ऐकुन आणि दिव्य ज्योतीच बोलण आठवुन एव्हाना वेदांगीला या जंगलात पावलो पावली रहस्यात्मक घटना घडतील याची कल्पना आलीच होती. तरी सुध्दा ती पक्षीराजना विचारते.

वेदांगी – “पक्षीराज आपण कोण आहात आणि आपली नेमकी काय कथा आहे कृपया सांगाल.”

पक्षीराज – “नागमाता, मी पक्षीराज नसुन जादुगार सुखदेव आहे. आज तुम्हाला जे माझ रुप दिसत आहे हे रुप माझ नाही. फार पुर्वी मी एक खुप नावाजलेला जादुगर होतो लोकांना आपल्या जादुचे प्रयोग दाखवुन आपल आणि आपल्या कुटूंबाच पोट भरायचो जादुच्या प्रयोगावरच माझा उदरनिर्वाह चालायचा माझी पुर्व पुण्याईच की काय मला काही दिव्य शक्ती ही मिळालेल्या होत्या त्याचाच उपयोग करुन लोकांच्या आनंदा साठी मी जादुचे खेळ करायचो. खेळ करता करता माझी किर्ती कधी पसरली मलाच कळाल नाही. एक दिवस मला विशेलीच्या राजदरबारा कडून निमंत्रण आल मला खुप आनंद झाला माला राज महालात जादुचे प्रयोग करायला मिळतील या विचाराने मी राजदरबारात गेलो. पण तीथे पोहोचताच राणी विशेलीने माझ्या कडच्या सगळ्या शक्ती काढुन घेतल्या आणि आपल्या शक्तीने पक्षीराज बनवल.”


पक्षीराजची करुण कथा ऐकुन वेदांगीच्या डोळ्यात पाणी आल. ती आपले डोळे पुसत पक्षीराजना म्हणाली.

वेदांगी – “पक्षाराज सुखदेव आपण काळजी करु नका आता आपल पहिल रुप परत येईल आणि आपल्या शक्ती सुध्दा तुम्हाला परत मिळतील मी तुम्हाला वचन देते.”

तीघांच्या गप्पा होत होत कधी सकाळ होते त्यांच त्यांना ही कळत नाही. सुवव्रत त्यांच बोलण मध्येच तोडत बोलतो.

सुवव्रत – “नागदेवी आपल्याला आता इथ थांबुन उपयोग नाही लवकर निघायला हव जास्त वेळ करून चालणार नाही आता. अजुन खुप लांब जायच आहे आपल्याला जितक लवकर निघू तीतक चांगल.”

लगेच पक्षीराज सुखदेव म्हणतात.

पक्षीराज सुखदेव – “नागमाता वैश्णवी तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला आणि रक्षक सुवव्रतना आपल्या पंखावर नेउन राजमहाला कडे सोडू? मला या जंगलाचे छुपे दरवाजे देखील माहीत आहेत मी तुमच्या कामी येउ शकलो तर हे माझ भाग्यच समजेन मी.”

दोघ एकमेकांकडे बघतात आणि इशा-यानेच एकमेकांना होकार कळवत पक्षीराजना ही आपला होकार कळवतात. पक्षीराज लगेच वेदांगी आणि सुवव्रतना आपल्या पंखावर बसवतात व आकाशाकडे झेप घेतात.

काही क्षणा नंतर...

वेदांगी आणि सुवव्रत सुखदेवच्या मदतीने राणी विशेलीच्या राजमहाला समोर पोहोचलेले असतात. पण आता त्यांच्या समोर प्रश्न असतो तो म्हणजे विशेलीचा अंत करायचा कसा? आणि त्या हुन देखील महत्वाच म्हणजे राजमहालात प्रवेश कसा करायचा.

सुखदेव दोघांना सोडुन निघुन जातो. इकडे वेदांगी आणि सुवव्रत राजमहालात शिरण्याचा विचार करत असतात. तेवढ्यात त्यांना काही शिपाई त्यांच्या कडे येण्याची त्यांना चाहुल लागते. आणि ते लगेच लपुन बसतात. शिपाई त्यांच्या समोरच बोलण्यात मग्न असतात वेदांगी आणि सुवव्रत त्यांच बोलण अगदी लक्ष देउन ऐकु लागतात.

शिपाई १ – “तुम्हाला माहीत आहे न. आज महालात एक समारंभ ठेवला गेला आहे. आपल्याला खुप जातीने लक्ष ठेवाव लागेल. कुठला शत्रु कुठल्या रुपात येईल सांगता येत नाही. आणि राणी सरकारचा राग तर तुम्हाला चांगलाच माहीत आहे तेव्हा अगदी बारकाईने प्रत्येकावर लक्ष ठेवा काम अगदी चोख पार पडल पाहीजे.”


शिपाई २ – “तुम्ही काहीच काळजी करु नका आम्ही येणा-या प्रत्येक व्यक्तीवर अगदी बारकाईने लक्ष ठेउत एक मुंगी सुध्दा महालात प्रवेश करु शकणार नाही.”

शिपाई १ – “ठीक आहे. मी येतो.”

आपल बोलण संपवुन सगळे वेगळे होतात. आणि वेदांगी व सुवव्रत परत बाहेर येतात.

वेदांगीला जरा काळजी वाटु लागते. ती विचार करते. “आता आपण महालात प्रवेश करायचा कसा.” आणि अचानक एक चमत्कार होतो. हा दैवी संकेतच असतो की, काय अचानक दोघांच रुप बदलु लागत. आणि दोघ एका वेगळ्या रुपात येउन महालात प्रवेश करतात.

क्रमश:

Post a Comment

0 Comments