अचानक एक आवाज येतो...
ब्रम्हास्त्र – “कोण आहेस तु? काय हवय तुला? आणि तुला भीती नाही वाटली इथ येण्याची?”
वेदांगी अगदी विनम्रतेने म्हणते.
वेदांगी – “महाराज, जी व्यक्ती चुकीच अथवा वाईट काम करते त्या व्यक्तीला भीती वाटत असते. मी तर इथे चांगल्या हेतुने आलीये मला आशा आहे तुम्ही मला नक्की मदत कराल.”
ब्रम्हास्त्र – “पण हे ठरेल तुझा हेतु चांगला आहे की वाईट? तुला माहीत नाही इथे आज पर्यंत जे कुणी येउन गेले ते परत बाहेर नाही आले.”
वेदांगी- “मला माहीत आहे महाराज. आज पर्यंत इथे जे कुणी आल ते लोक परत बाहेर नाही गेले. कारण ते सगळे स्वार्थापोटी इथे आले होते पण माझ तस नाही मी आलीये ते जगत कल्याणा साठी माझ नाव वेदांगी आहे. मी धरती वरुन आलीये हे जंगल पार करुन आलीये.”
हे ऐकताच रक्षक ब्रम्हास्त्रंचे डोळे एकदम चमकतात. ते एकक्षण विचार करतात. “आपण जीचा इतके वर्ष वाट पहात होतो ही तीच तर नाही.” ते विचार करतात आणि तीची परिक्षा घ्यायच ठरवतात.
ब्रम्हास्त्र – “कशावरुन तु चांगल्या हेतुने आली आहेस सिध्द करु शकतेस?”
वेदांगी- “बोला मी काय करु म्हणजे तुमचा विश्वास बसेल मी तुमची कुठली ही परिक्षा द्यायला तयार आहे.”
वेदांगीच बोलण ऐकुन रक्षक ब्रम्हास्त्रना विश्वास बसतो ही तीच आहे जी भयासुरचा अंत करेल ते एक स्मित हास्य करतात आणि म्हणतात.
ब्रम्हास्त्र – “ठीक आहे तर दे पुरावा तुझा इथे येण्याचा हेतु चांगला आहे. या साठी तुला माझ्या तीन प्रश्नांची अचुक उत्तर द्यावी लागतील आहे तुझी तयारी?”
वेदांगी आत्मविश्वासाने म्हणते.
वेदांगी – “हो, आहे माझी तयारी विचारा जे विचारायच असेल ते. मी प्रत्येक प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे.”
रक्षक ब्रम्हास्त्र – “ठीक आहे मग ऐक. १. कर्तव्य श्रेष्ठ की एखाद्याला केलेली मदत?”
वेदांगी – “दोघांमध्ये फारसा फरक नाही महाराज कर्तव्य कुठली ही असो ती श्रेष्ठच असतात आणि एखाद्याला केलेली मदत सुध्दा तीतकीच श्रेष्ठ असते. फरक इतकाच की ती केलेली मदत ही नेमकी कोणत्या भावनेने केलेली आहे चांगल्या की वाईट हे पहाण महत्वाच आहे. कर्तव्य ही कर्तव्यच असतात आणि एखाद्याला केलेली मदत मात्र मनातले विचार तसेच कोणत्या भावनेने मदत केलेली आहे ह्यावर अवलंबुन असते.”
“वा!! खुप सुंदर” रक्षक आनंदुन म्हणतात व पुढचा प्रश्न विचारतात.
रक्षक ब्रम्हास्त्र – “आता दुसरा प्रश्न. २. कठीण परिस्थीतीत असताना स्वत:ला आणि दुस-यांना कस सांभाळुन घेशील?”
वेदांगी थोडा विचार करते. आणि उत्तर देते.
वेदांगी – “परिस्थीती ही कधी ही सांगुन येत नसते महाराज ती कुठल्या ही रुपात येउ शकते त्यामुळे आपण प्रत्येक परिस्थीतीशी दोन हात करायला तयार रहायला हव जर माझ्यावर अशीच काहीशी परिस्थीती ओढवली तर आधी तर मी परिस्थीती ओढवण्याची वाटच पहात बसणार नाही मी प्रत्येक गोष्टीची आधीच तयारी केलेली असेल. पण तरी ही एखादी कठीण परिस्थीती आलीच तर स्व:था हुन पुढाकार घेईल समस्या समजुन घेईल आधी तर धीराने घेईल मग समोरच्याला ही धीर देउन त्यांच्यात हिमतीने पुढे सरसावण्याचा आत्मविश्वास जागवेल.”
आता रक्षक ब्रम्हास्त्रना खात्रीच पटते आपण आज पर्यंत जीची वाट पहात आलो ती हीच आहे. ते लगेच तीसरा प्रश्न विचारतात.
ब्रम्हास्त्र – “वेदांगी आता हा शेवटचा प्रश्न याच उत्तर बरोबर दिलस तरच वाचशील. ऐक ३. जीवनदान आणि क्षमादान यात काय फरक आहे?”
वेदांगी लगेच उत्तर देते.
वेदांगी – “नावा इतकाच महाराज. जीवनदान आणि क्षमादान हे दोन्ही आपापल्या ठीकाणी श्रेष्ठ असे मानले जाणारे दान आहेत. एखाद्याला जीवनदान दिल्याने मनाला समाधान मिळत तर एखाद्याला क्षमा केल्याने मनावरच ओझ कमी होत आणि मनाला शांती सुध्दा मिळते. म्हणून दोन्ही दान आपापल्या ठीकाणी श्रेष्ठ आहेत जीतक एखाद्याला जीवन देण पुण्याच काम आहे तीतकच एखाद्याला माफ करण.”
रक्षक वेदांगीची उत्तर ऐकुन खुश होतात. आणि म्हणतात.
रक्षक – “वाह.. पोरी वाह.. मी तुझी उत्तर ऐकुन खुश झालो मला खात्री पटली आहे आज पर्यंत ज्या मुलीची मी आतुरतेने वाट पहात होतो ती तुच आहेस तुच जगाची उध्दारकर्ती आहेस घे ही कुपी हे विषाअमृत यावर फक्त तुझाच हक्क आहे. आज मी माझ्या कर्तव्यातुन मुक्त झालो. माझा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे तुझ कल्याण हो.”
एवढ बोलताच रक्षक अदृश्य होतात. आणि वेदांगी नागकन्या वैश्णवी बनते. आणि अचानक तिच्या हातात एक त्रिशुल येत.
काही क्षणा नंतर...
वेदांगी परत आपल्या रुपात येते आणि वनरक्षक सुवव्रत व वेदांगी विशेलीच्या राजवाड्या कडे निघुन जातात.
क्रमश:
0 Comments