वेदांगी मनात विचार करते. “दिव्य ज्योतीने सांगितल होत इथे भास होतात मग वनदुत सत्य आहेत की भास.” तेवढयात वनदुत बोलु लागतात.
वनदुत सुवव्रत- “तुमची भीती शंका मी समजु शकतो पण तुम्हाला मला घाबरायच कारण नाही तुमच्या मनातल मी ओळखु शकतो. मी खरच या वनाचा दुत आहे. हे जंगल एक रहस्य आहे इथे कुठल्या क्षणी काय घडेल सांगता येत नाही मी कैक वर्षांपासुन या जंगलाची रक्षा करतोय पहिले हे जंगल अस नव्हत. तर एक सुंदर नगरी होती एक राज्य होत इथले लोक आपापसात अगदी खेळीमेळीने रहात होते त्यावेळी इथे राणी विशेलीच राज्य नव्हत तर महाराज दुर्गेशच राज्य होत. महाराज दुर्गेश प्रजाहितदक्ष राजा होते. ते आपल्या प्रजेची खुप काळजी घेत असत पण विशेलीची राज्यावर नजर होती तीने महाराजाना आपल्या प्रेम जालात अडकवल आणि या राज्याची राणी विशेली बनली व महाराजांचा अंत केला त्या क्षणी एक आकाशवाणी झाली. “तुझा अंत करायला लवकरच इथे एक दिव्य शक्ती येइल आणि तुझा अंत करेल.” तेव्हा पासुन हे राज्य एक जंगल बनलय.”
वेदांगी वनदुतना विचारते.
वेदांगी- “विशेलीचा अंत करण्यासाठी काही उपाय नाहीये का मग?”
वनदुत सुवव्रत- “उपाय तर आहे पण यात संकट ही आहेत आणि तो उपाय तुम्हीच करु शकता म्हणून तर तुमच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासुन आम्ही तुमची वाट पहात आहे.”
वेदांगी- “काय उपाय आहे?”
वनदुत सुवव्रत- “हे जंगल पार केल्या नंतर एक खुप मोठी गुहा लागते. अस ऐकलय आजपर्यंत त्या गुहेतुन कुणी बाहेर नाही आलय कारण ती गुहा ब्रम्हास्त्रची आहे. एक अस शस्त्र जे करोडो वर्षांपासुन विशांअमृत ची रक्षा करत आलय. विशांअमृत हे अस एक विश आहे जे खास विशेली ला मारण्या करता बनवण्यात आलेल आहे. हे विश बारा वेगवेगळ्या विशारी पानांनी बनवलेल आहे. तसेच त्याला ५२ दिवस होम हवन करुन १०८ ऋषी मुनींनी आपल्या मंत्र शक्तीने अभिमंत्रीत केलय. आणि ते एका खास कुपीत ठेवल गेलय त्याची रक्षा हे ब्रम्हास्त्र कैक वर्षांपसुन करत आलय या गुहेत जाण इतक सोप्प नाही आज पर्यंत
ब-याच जणांनी ते विश हस्तगत करण्याचा प्रयत्न केला परंतु ते गुहेच्या बाहेर नाही आले ते विश तीच व्यक्ती मिळवु शकतात जे ब्रम्हास्त्रच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर देतील आणि जेव्हा विशेली ते विश पील तेव्हाच तीचा अंत होइल. कारण विशच विशाला मारत अस म्हणतात. ते विशअंमृत म्हणजे विशेली चा अंत आहे. आणि तुमच्या दुस-या दरवाजाची चावी सुध्दा. मला माहीत आहे तुम्ही तुमच्या शक्ती आणि नागराज देव व भयासुरचा वध करण्याची तयारी करत आहात आमच तुम्हाला पुर्ण सहकार्य आहे आणि या करताच मी देखील इथे आहे.”
वेदांगी थोडा विचार करते. आणि बोलते.
वेदांगी – “कुठे आहे ती गुहा मी जायला तयार आहे गुहेत.”
वेदांगी आणि सुवव्रत जंगलाच्या वाटेने गुहेच्या दिशेने चालु लागतात. बराच वेळ चालल्या नंतर वेदांगीला थकवा जाणउ लागतो म्हणून विश्रांतीसाठी आडोशाला दोघ जरा वेळ बसतात. तेवढयात कुठन तरी एक खुप मोठा सर्प त्यांचा पाठलाग करत तीथे पोहोचतो त्याला बघताच वेदांगीचा थरकाप उडतो आणि ती एकदम ओरडते.
वेदांगी(भीतीने)- “साप... साप... साप...”
तेवढयात सुवव्रतच सापाकडे लक्ष जात आणि तीथेच दोघांमध्ये युध्द सुरू होत. बराच वेळ लढल्या नंतर सुवव्रत त्या विशालकाय सर्पाला मारुन टाकतो आणि आता इथे जास्त वेळ थांबुन उपयोग नाही असा विचार करुन दोघ परत चालायला सुरवात करतात.
काही वेळा नंतर....
ती विशालकाय गुहा येते. आजु बाजुनी संपुर्ण डोंगराळ भाग असलेली आत मध्ये सगळीकडे अंधार फक्त दोन्ही भिंतीमधुन एक छोटासा रस्ता जात होता. आजुबाजुला उंदरांचा सुळसुळाट कुठे कपारीत सर्पांची चाहुल लागत होती. सुवव्रत नी मशाल पेटवली आणि दोघ चालु लागले थोड पुढे जाताच त्यांना वटवाघुळांचा एक थवा लागला तस ते घाबरले आणि एकदम खाली बसले. काही क्षणा नंतर परत दोघ चालु लागले नागमोडी रस्त्याने चालत चालत अंधारात मिणमिणत्या प्रकाशात तो रस्ता संपण्याच नावच घेत नव्हता त्या गुहेची रचना अशी काही केली गेली होती की कोणी ही गुहेत शिरल तर परत बाहेर येण्याची कुठलीही शक्यताच नाही अशा गुहेत दोघ नुसते चालत होते सोबत एक अनामिक भिती घेउन. खुप चालल्या नंतर त्यांना एक मिणमिणता प्रकाश दिसला ती दोघ त्या दिशेने पुढे जात गेले.
काही वेळा नंतर....
ती दोघ ब्रम्हास्त्र समोर उभी होती....
क्रमश:
0 Comments