नागशास्त्र एक अद्भुत गाथा (भाग - सतरावा )


वेदांगी नागशास्त्रला वंदन करुन नागशास्त्र पुस्तक उघडते. तस वादळाचा एक झंजावात सुरू होतो विजा कडाडु लागतात आणि अचानक कर्णकर्कश्श आवाज कानी पडतो. तस वेदांगी त्या दिशेने बघते आणि एक दरवाजा उघडला जातो.

वेदांगी हळुहळू चोर पावलांनी दरवाज्याकडे जाते समोर एक गडद्द जंगल असत. हिरव्यागार झाडांनी अच्छादलेल एक महा भयानक जंगल. इतक कि ते जंगल बघुन कुणीही घाबरेल वेदांगी तसच जंगलात प्रवेश करते. चालत जाते चालत जाते मध्येच चित्र विचीत्र प्राण्यांचा आवाज येत असतो जस काही ते आस पासच आहेत तरी आपला जीव मुठीत धुरून देवाच नाव घेत घेत ती पुढे जातच असते.

वेदांगीचा एक वेगळाच स्वभाव होता. तीला लहान पणा पासुनच शिकवल गेल होत कुठल्याही गोष्टीला घाबरायच नाही मग ती किती ही भीतीदायक असो त्याच्या मुळापर्यंत जायच आणि आज तीच शिकवण तीच्या उपयोगी पडत होती. वेदांगी पुढे पुढे जातच होती मधेच कुठला आवाज आला तर आवाज्याच्या दिशेने बघत वेदांगी पुढे जात होती. मजल दर मजल करत राणी विशेलीच्या शोधात जंगलात भटकत होती. विशेलीला शोधण तीच्या पर्यंत पोहोचण इतक सोप्प नव्हत तो राजवाडा विशेलीचा होता. तिच्यासारखाच विशधारी. विशेलीने आपल्या राजवाड्याची अशी काही रचना केली होती की तीच्या राज्यात पाउल ठेवणवारी कुठलीही व्यक्ती असो किंवा प्राणी असो ते जागीच ठार होत असत. कारण तिने आपल्या राजवाडयात अनेक प्रकारच्या विशारी वृक्षांची लागवड केली होती त्या वृक्षांची रक्षा भले मोठे विशारी सर्प करत असत. त्यांच विश इतक जहाल होत की त्यांच्या नुसत फुत्काराने समोर असलेला प्राणी मरुन जात. अश्या भयानक राजवाडयात वेदांगी आता जाणार होती.



पण म्हणतात कुठल ही संकट असो त्याचा काही न काही तोड हा असतोच विशेलीच्या विशाचा ही तोड होता तो म्हणजे ‘विश’.

एक अस विश जे बारा वेगवेगळ्या प्रकारच्या विशारी पानांच्या रसाने बनवलेल होत त्याला १०८ ऋषीं मुनीं नी आपल्या मंत्र शक्तीने अभिमंत्रीत केलेल होत. ५२ दिवस अहोरात्र होम हवन करुन त्या शक्तीने रसाला अभिमंत्रीत केल गेल होत. पण ते मिळवण देखील सोपी गोष्ट नव्हती ते विश मिळवण्या साठी वेदांगीला आधी विश रक्षक ब्रंम्हास्त्रशी सामना करावा लागणार होता. ब्रंम्हास्त्र एक अस शस्त्र एक असा बाण जो लागताच कोणी ही त्यात अडकला जाईल.पण इथे विश हस्तगत करायला येणा-यास त्या शस्त्राच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील आणि जो कोणी योग्य उत्तर देइल त्यालाच ते विश मिळेल पण जर उत्तर देण्यास ती व्यक्ती चुकली तर मात्र त्याचा जीव गेलाच म्हणून समजाय.

आता वेदांगीला राजवाडा आणि विश दोन्हींचा शोध घ्यायचा होता. असच ती घनदाट जंगलातुन जात होती. मनातुन ती प्रचंड घाबरलेली देखील होती. तरीही तीचा प्रवास सुरूच होता.

आणि अचानक कुठून तरी एक वाघ तीच्या समोर आला तस ती भीतीने पुर्ण गारठली तीला एक क्षण आपण काय कराव हेच सुचेना तसच तीने देवाचा धावा करायला सुरवात केली आणि जीथे रस्ता मिळेल तीकडे ती धावत सुटली वाघ मागे ती पुढे असा जवळ जवळ एक तास खेळ सुरु होता ती नुसत एक सारख पळत होती तीच मागे लक्ष ही नव्हत मागे वाघ आहे की नाही. बस एक सारखी एकाच दिशेने पळत होती.

काही वेळा नंतर....

तीला एक झोपडी दिसली आपल्याला लपायला एक जागा तर मिळाली अस वाटुन तीने त्या झोपडीत प्रवेश केला. तर झोपडीत कुणीच नव्हत आणि रात्र ही खुप झाली होती म्हणुन तीने झोपडीतच रहायचा निर्णय घेतला बाहेर वाघ झोपडीत अंधार आणि पोटात भुकेने कावळे ओरडत होते काय कराव कस कराव या विचारात असतानाच वेदांगीला दिव्य ज्योतीने सांगीतलेली आणखी एक गोष्ट आठवली ती म्हणजे. “जंगलात पाउल ठेवताच तुला चित्र विचीत्र भास होउ लागतील एक क्षण अस ही वाटेल हे सत्य आहे की, कुठला भास पण तुला आपल्या मनावर ठाम रहायच आहे आणि एक अजुन महत्वाच जंगलात पोहोचताच कुठल्या ही वृक्षांना अथवा फळांना किंवा खाण्याच्या कुठल्या ही वस्तुना स्पर्ष करु नका ते जंगल एक मायाजाल आहे तीथे मृत्युचा धोका आहे म्हणुन तुम्हाला खुप भुक लागेल तहान लागेल पण हीच तुमची खरी कसौटी आहे मला खात्री आहे तुम्ही यातुन नक्की सुटाल आपली काळजी घ्या”


हे आठवताच वेदांगी भानावर येते. आणि रात्र तशीच देवाच नाव घेत काढते. तीला कधी झोप लागते हे तीच तीला देखील कळत नाही.

दुस-या दिवशी सकाळी...

वेदांगी झोपडीतुन बाहेर येते. व एकदा इकडे तिकडे नजर फिरवुन साचल घेते तिला खात्री पटते आपल्या आस पास कुणी नाही असा विचार करुन ती पुढच्या प्रवासाला निघते सावध राहुन थोडा थोडा साचल घेत घेत वेदांगी जंगलात फिरत असते. कधी एखादा दगड दिसला कि थोडस बसुन मग परत पुढचा जंगल प्रवास अस तीच सुरू होत.

काही वेळा नंतर...

अचनक तिच्या समोर एक सुंदर देखणा एका हातात तलवार दुस-या हातात धनुष्य असा राजा सारखा दिसणारा एक युवक येउन उभा रहातो. त्याला बघताच वेदांगी विचारात पडते. “हा भास आहे की सत्य? कोण आहे ही व्यक्ती विशेली ने तर पाठवल नसेल न याला?” ती विचार करतच असते की तो युवक बोलु लागतो.

वनदुत सुवव्रत- “घाबरु नका नागदेवी मी तुमच्या साठीच इथे आलो आहे. मी वनदुत सुवव्रत या वनाचा रक्षक. मला माहीत होत एक ना एक दिवस तुम्ही इथे नक्की याल आणि या वनाला विशेलीच्या हातुन नक्की सोडवाल म्हणुन मी तुमच्या रक्षणासाठी इथे आलो आहे.”

क्रमश:

Post a Comment

0 Comments