नागशास्त्र एक अद्भुत गाथा (भाग - सोळावा )


नागराज चिराग- “चला आता समोरच्या नदीत पहिले स्नान करुन या. व या कलश मध्ये नदीचे शुध्द जल घेउन या आणि गुरूदेव सौभद्र यांनी जो मंत्र तुम्हाला दीला आहे त्याचा १०८ वेळा जप करत गणराज आणि महादेव यांना त्या जलानी अभिषेक करा.”

वेदांगी स्नान करायला नदीत जाते आणि येताना कलश भरुन जल घेउन येते. व सांगितल्या प्रमाणे गणराज आणि महादेव यांची पुजा करायला सुरवात करते.

काही वेळा नंतर....

१०८ वेळा जप केल्यानंतर....

वेदांगी गणराज आणि महादेवांना नमस्कार करते. तेवढ्यात तीला जाणवत आपल्यात काहीतरी बदल होत आहे. ती एकदा आपल्या हातांना स्पर्श करुन बघते तर तीचे हात सोनेरी रंगाचे झालेले असतात. ती गणराज व महादेवांना नमस्कार करते व फुल हळद कुंकूनी नागशास्त्राची पुजा करते. तस त्यातुन प्रकाश उत्पन्न होतो तसेच एक दिव्य ज्योत प्रगट होते आणि वेदांगीशी बोलु लागते.

दिव्य ज्योत – “नागदेवी वैश्णवींना माझा नमस्कार मी खुप भाग्यशाली आहे की मला तुमचे दर्शन झाले. बोला मी तुमची काय मदत करु शकते.”


वेदांगी नागराज श्रीधर यांच्या कडे बघते तेव्हा नागराज वेदांगीला सांगतात.

नागराज श्रीधर – “वेदांगी ही दिव्य ज्योत या नागशास्त्राची रक्षक आहे. यांच्या आज्ञे शिवाय याला हात लावण्याची कोणीही हिंम्मत करु शकत नाही म्हणुनच आज पर्यंत ज्यानी कुणी नागशास्त्रला पळवायचा प्रयत्न केला तो आज या जगात नाही ही ज्योत रक्षक तर आहेच पण मर्गदर्शक देखील आहे. आज तुला ही ज्योतच मार्ग दाखवेल. त्यांना नमस्कार कर.”

वेदांगी ज्योतला नमस्कार करते तस ज्योत बोलु लागते.

दिव्य ज्योत – “नागदेवी वैश्णवी नागशास्त्र हे फक्त एक पुस्तक नाहीये तर हे एक सार आहे नागलोक आणि विशलोक याच म्हणजे जस मनुश्यांमध्ये पिढयांचा इतिहास असतो तस हे नागशास्त्र एक प्रकारे नागलोकांचा आणि विशलोकाचा इतिहास आहे. तुम्हाला हे तर माहीतच असेल की मनुष्याच्या या धरती वर नागदेवाना येण्यास परवांगी नसते नागदेवता तेव्हाच धरती वर पाउल ठेउ शकतात जेव्हा साक्षात महादेवांची आज्ञा असेल. धरती वर जाण्यासाठी आधी महादेवांना प्रसन्न कराव लागत त्या नंतरच नाग नागीणींना धरतीवर जाता येत. पण तुमच्या बाबतीत जरा वेगळ झाल आहे कारण तसा महादेवांचाच आदेश होता आज धरती वर जे संकट आल आहे त्यातुन फक्त एक मनुष्यच धरतीला वाचउ शकतो ज्यात अपार शक्ती असेल आणि जो मनाने सच्चा व हिम्मत वाला असेल आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही या धरतीचे आणि नागलोकाचे उध्दार कर्ते आहात तुम्ही खुप भाग्यवान आहात कारण महादेवांनी या साठी तुमची निवड केली आहे. नागलोका मध्द्ये जेव्हा नागराज कालीया आणि नागराज देव यांच्यात युध्द झाल आणि नागलोकाचे दोन भाग झाले तेव्हा एक भविष्यवाणी झाली ती म्हणजे. ‘कलीयुगात एक मुलगी जन्माला येइल ती स्वथाच तुम्हाला शोधेल ती तुमची उध्दारकर्ती असेल. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तीला निष्ठेने या सात मार्गावरुन आपल्या शक्तींना मिळवण्यात यश मिळेल.’ आता ते सात मार्ग कुठले आहेत ते मी सांगते ते नीट ऐका मी तुम्हाला फक्त मार्ग सांगेन परंतु त्या मार्गावरुन पुढे जाउन यश मिळवण आणि भयासुर तसेच नागराज देव यांचा अंत करण हे तुमच तुम्हालाच करायच आहे.”


वेदांगी सगळ अगदी नीट लक्ष देउन ऐकत असते. ती दिव्य ज्योतीला विचारते.

वेदांगी – “कृपया मला ते सात मार्ग सांगा न आता मी समोर येणा-या प्रत्येक आव्हानाला सामोर जायला तयार आहे.”

दिव्य ज्योत पुढे सांगु लागते.

दिव्य ज्योत – “ऐक तर मग. हे पुस्तक म्हणजे मंदीराच्या सात दरवाजांच्या सात चाव्या आहेत आणि हेच एक महत्वाच ह्या नागशास्त्राच रहस्य आहे. जस तु हे पुस्तक उघडशील एक दरवाजा उघडेल आणि तीथुनच तुझा खरा प्रवास सुरू होइल. कारण तो एक दरवाजा म्हणजे तुझा पहिला मार्ग असेल. दरवाज्यातुन आत गेल्यावर तुला एक मोठ जंगल लागेल त्या जंगलाची राणी आहे राणी विषेली. राणी विषेली एक महा भयंकर विषकन्या आहे तीच्या मध्ये नाग सर्प विंचु खेकडा अश्या हजारो लाखो विषारी प्रांण्यांचे विष आहे. तीच्या नुसत हसण्याने समोरच्याचा जीव जातो. त्यामुळे तुला तीचा शर्तीने नाही तर युक्तीने सामना करावा लागेल. आणि तीचा जादुई दांडु हस्तगत करावा लागेल तेव्हाच दुसरा दरवाजा उघडेल आणि हळुहळू तुझ्या बाकीच्या शक्ती देखील तुला मिळत जातील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव असत्य कितीही शक्तीशाली असु दे विजय मात्र सत्याचाच होत असतो तु सत्यासाठी लढती आहेस त्यामुळे विजय तुझाच होणार आमच्या सगळ्यांचा आशिर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. तुझ कल्याण हो...”

एवढ बोलुन दिव्य ज्योत नाहीशी होते. आणि नागशास्त्र परत पुर्ववत होत. सगळे महादेव नागशास्त्र आणि गणराजांना वंदन करतात.

क्रमश:

Post a Comment

0 Comments