नागशास्त्र एक अद्भुत गाथा (भाग - पंधरावा )


वेदांगी सगळ्यांच्या पाया पडते. सगळ्यांचा आशिर्वाद घेते तेवढ्यात आसुतोश राव बोलतात.

आशुतोशराव – “बेटा १०८ दिवस?”

वेदांगी- “होय बाबा १०८ दिवस. मी स्वथ:ला खुप भाग्यवान समजते परमेश्वरानी या कार्यासाठी माझी निवड केली. नाही तर माझ्या आयुश्यात ते प्रोजेक्ट कस आल असत ही सगळी परमेश्वराचीच तर लीला आहे. अचानकपणे माझ्या मनात नागदेवतां बद्दल जाणुन घेण्याची उत्सुकता निर्माण होण अस अचानकपणेच नागदेवतांच समोर येण आणि एक मोठ कार्य माझ्या हातुन घडायला सुरवात होण ही त्यांचीच तर लीला आहे. बाबा अस म्हणल जात कधीही कुठल ही काम हे आपण स्वत: ठरउन करत नाही ते आधीच ठरलेल असत माझ्या बाबतीत देखील असच घडलय माझा अध्याय पहिलेच लिहीला गेलेला आहे. आता फक्त एवढच बघायच आहे यात जिंकत कोण. पण तुम्ही आहात न सगळे कायम माझ्या पाठीशी तुमच्या शिवाय मी अधुरी आहे.”

सगळे एकमेकांशी बोलण्यात मग्न असतात. त्यांना भान ही नसत आपल बोलण कुणीतरी ऐकत आहे. पण नागराज श्रीधरना त्याचा आभास होतो आणि नागराज वेळीच सावध होतात. ते एकदा खीडकी जवळ जाउन बघतात तर भयासुरला कैदेत ठेवलेल झाड तोडल गेलेल असत. नागराज झाडा बद्दल विचारतात.



नागराज श्रीधर – “हे घर होण्या आधी पासुन ईथे एक झाड होत त्याच काय झाल सांगु शकाल का?”

सगळे एकमेंकडे बघतात. आशुतोश राव सांगतात.

आशुतोश राव- “ते ईतक जुनाट झाड अचानक कस काय पडल कुणालाच माहीत नाही. त्यानंतर आज एक विचीत्र घटना ही घडली आहे. आमचा तर विश्वासच बसत नाहीये त्यावर.”

नागराज श्रीधर – “नेमक काय घडल होत आज?”

आशुतोश राव (थोड भीत भीत)- “आज आम्ही एक भयानक असुर बघीतला.”

नागराज श्रीधर(काळजीत येउन)- “काय?... त्याला तर झाडाच्या डोलीत असायला हव होत. म्हणजे देवा आणि असुरराज एकत्र आले आहेत तर. बेटा आता तुझ इथे थांबण योग्य नाही तुझ्या जीवाला धोका आहे देवा आणि असुरराज ह्या सगळ्यांना काही करणार नाही त्यांना तु हवी आहेस. (घरातल्यांना) पण तरी कुणी ही तुम्हाला काही की विचारल तर फक्त एवढच सांगा की आम्हाला माहीत नाही बस. आम्ही येतो (वेदांगीला) चल बेटा इथुन”

वेदांगी आणि श्रीधर दोघ लगेच बाहेर पडतात. आणि थेट महादेवांच्या पुरातन मंदीरात येउन पोहोचतात. पण कस कोण जाणे भयासुरला हे समजत आणि त्यांचा पाठलाग करत भयासुर ही मंदीराच्या पायथ्यापर्यंत पोचतो तेवढ्या नागराज चिराग मंदीरात प्रवेश करतात आणि आपल्या शक्तीने मंदीरा भोवती एक शक्तीशाली वलय तयार करतात. आणि वेदांगीला पुजा करण्याचे विधी सांगायला सुरवात करतात.

नागराज चिराग- “राजकुमारी वैश्णवी आता तुम्ही नाग कन्या बनण्यासाठी सज्ज होत आहात. आता इथुन पुढचा तुमचा प्रवास थरारपुर्ण असेल तुम्ही घाबरु नका तुमच रक्षण करायला महादेव आहेत बस त्यांच्यावर विश्वास ठेवा. आता मी जस सांगेन तस करायच आज तुम्हाला महादेवांची आणि गणरायांची शास्त्रशुध्द पुजा करायची आहे. आणि मग ह्या पुस्तकाची देखील पुजा करायची आहे. मगच तुम्हाला तुमच्या शक्ती मिळण्यास मदत होईल. ही आपल्या नागलोकाची पध्दत आहे. तुम्हाला माहितच असेल कुठल्या ही शुभ कार्याची सुरवात आपण विघ्नहर्ता गणेश यांना स्मरुन मगच करतो पण इथे शुभ कार्याची सुरवात म्हणून विघ्नहर्ता गणेश यांच्या बरोबर महादेव आपले आराध्य यांची पुजा करुन करतो आणि ज्या नाग नागीणींना यांचा आशिर्वाद मिळतो ते जन्म जन्मांतरीचे धनी होतात कारण स्वथ: महादेव त्यांच्या पाठीशी उभे असतात. मग करायची पुजेला सुरवात.”


वेदांगी – “पिताश्री चांगल्या कामाची सुरवात तर मोठ्यांच्या पाया पडुन सुध्दा करतात न. आणि मी तर एक खुप मोठ काम करायला निघालीये तुम्ही दोघ मला आशिर्वाद नाही देणार.”

वेदांगी पहिले गणराज आणि महादेवांना नमस्कार करते मग दोघांच्या पाया पडते.

क्रमश:

Post a Comment

0 Comments