नागशास्त्र एक अद्भुत गाथा (भाग - चौदावा )

 



काही वेळां नंतर...


तीथे नागराज श्रीधर येतात ते दोघांच बोलण ऐकत असतात. देवा च नाव ऐकताच श्रीधर वेदांगीला देवा बद्दल सांगु लागतात.


नागराज श्रीधर- “बेटा तुला देवा कसे माहीत? आमच्या सारख तु त्यांना ही बघीतलस का”


वेदांगी- “पिताश्री मी त्यांना आणि वैश्णवीला ध्यानामध्ये बघीतल आज मी घरी ध्यान करत होते तेव्हा मला वैश्णवी दिसली आणि तीच्या तोंडुन मी नागराज देवांच नाव ऐकल.”


नागराज श्रीधर- “बेटा तु मला पिताश्रीच हाक मारत जा आज तुझ्या कडुन पिताश्री ऐकुन खुप बर वाटल आज मला तीच लहानगी वैश्णवी दिसत आहेस तु. बेटा देवा हा पुर्विचा खुप आधीचा नागलोकाचा सरदार होता. म्हणजे नागराज चिरागच्या आधीचा सरदार. पण तो एक लालची सरदार होता त्याला नागलोकाचे संपुर्ण राज्य हवे आणि त्यासाठी तो नागशास्त्रच्या मागे होता. त्याने कित्येकदा रहस्यमयी पुस्तक हस्तगत करण्याचा प्रयत्न देखील केला होता पण त्याचे प्रत्येकवेळी प्रयत्न निश्फळ ठरले आणि त्याच्या पदरात निराशाच आली पण त्यावेळी कस कोण जाणे ते पुस्तक त्याच्या जागेवरुन गायब झाल आणि आज ते सापडतय.”




वेदांगी- “पिताश्री ते पुस्तक वैश्णवी धरतीवर घेउन आली होती. जीतका मी शोध घेतलाय त्या वरुन ते पुस्तक एका नागाच्या हाती लागल होत पण अचानक त्याच्या वाईट विचारांमुळे अचानक ते पुस्तक अदृश्य होउन एका जंगलात येउन पडल त्यानंतर ते दोन वाटसरूंच्या हाती लागल ते युनिक संग्रहालयात काम करायचे त्यांनी ते पुस्तक संग्रहालयात आणून ठेवल. आत्ता मला समजतय ती माणस एकदम वेगळ्या नजरेने का बघत होती माझ्या कडे कदाचीत ती माझ्यावर नजर ठेवत होती.”


नागराज चिराग- “म्हणजे जस आता आम्हाला तुझ्या बदृल समजलय तुला बरचस समजलय तस त्यांना देखील समजल असणार. म्हणजे आता आपल्याला अधीक वेगाने सुरवात करावी लागेल.”


नागराज श्रीधर- “निश्चीतच आणि म्हणूनच मी ही आज ईथे आलो आहे. (नागराज चिरागना). नागराज तुम्ही आज पासुनच वेदांगीची दीक्षा आरंभ करा तीला तीच्या सर्व शक्ती आणि तीचे शस्त्र तीला लवकरात लवकर मिळायला हव्यात हे बघण तुमच काम आहे नागकन्येच्या जीतक्या शक्ती आहेत आणि जीतकी शस्त्रे आहेत ते सर्व आज वेदांगी कडे असायला हव. आणि हे सगळ लवकरात लवकर (वेदांगीला) आणि वेदांगी तुला ही नागराजांकडुन जीतक शिकुन घेता येईल तीतक घे आज पासुन नागराज चिराग तुझे गुरू.”


वेदांगी जरा विचारात पडते आणि म्हणते.


वेदांगी- “मी घरी जाउन आल तर चालेल का? एकदा सगळ्यांना भेटून येते मग सुरू करुत.”


नागराज श्रीधर – “हो... हो... वेदांगी नक्कीच कारण आता पुढचे काही महीने तुला ईथेच रहाव लागणार आहे. नागराज चिराग तुझ्या कडून १०८ दिवस महादेवांची पुजा करुन घेतील या १०८ दिवसात तुला बरेच अनुभव देखील येतील तसेच याच १०८ दिवसात तुला नागशास्त्र मधील रहस्य जाणून घेण्याची संधी देखील मिळणार आहे. त्यामुळे तुझा आता हा प्रवास खुपच रोमांचित आणि रहस्यपुर्ण असेल. पण यासाठी तुला घरच्यांना भेटण खुपच आवश्यक आहे. आणि यावेळी मी ही तुझ्या बरोबर असेन काळजी करु नकोस.”



एवढ बोलुन दोघ घराकडे निघतात. आणि नागराज चिराग परत नागलोका काडे परततात.


काही वेळा नंतर....


वेदांगीच्या खोलीत वेदांगी आणि नागराज श्रीधर प्रगट होतात. आणि दोघ ही एकदम खोलीतुन बाहेर येतात. हॉलमध्ये सगळेजण वेदांगीच्या काळजीत बसलेले असतात. वेदांगी घरात नाहीये हे सगळ्यांना समजलेल असत. आणि त्यातुन भयासुर देखील आपल्या शक्तीने बाहेर आलेला असतो. तो भयानक असुर बघुन सगळ्यांची अक्षरश: भितीने गाळण उडालेली असते.


ह्या सगळ्या घटना विधीलीखीत असतात आणि त्या तश्याच घडायला आता सुरवात झालेली असते.


नागराज श्रीधर आणि वेदांगी जेव्हा खोलीतुन बाहेर येतात तेव्हा तर साक्षात नागराजांना वेदांगी बरोबर बघुन सगळ्यांना दरदरुन घाम फुटतो घरातले प्रत्येकजण नुसत भितीने एकमेकांकडे बघत असतात. नागराजांना सगळ्यांच्या चेह-यावरची भिती समजते. नागराज एकदा वेदांगीकडे बघतात. आणि स्मीतहास्य करतात.


वेदांगी ही त्यांना बघुन स्मीतहास्य करते आणि सगळ्यांना शांत करत सगळ्यांची समजुत काढत बोलु लागते.


वेदांगी(समजुत काढत)- “मला माहीत आहे, आत्ता तुमच्या मनात पिताश्रींना बघुन खुप भिती आहे. पण यांना भिण्याच काही एक कारण नाहीये हे आपले शत्रु नसुन हितचिंतक आणि रक्षक आहेत तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे माझे पुर्व जन्मीचे वडील आहेत. हो आई, बाबा आज्जी मला माझा पुर्वजन्म आठवला आहे आणि धरतीवरच माझ कार्य देखील आणि हे शक्य झाल केवळ गुरुजींमुळे आणि आता मी त्याच्याच पुढच एक पाउल घ्यायला निघाले आहे आता पुढचे १०८ दिवस मी पुरातन महादेवांच्या मंदीरात असेल माझ्या या कार्यासाठी तुम्ही सगळे मला आशिर्वाद नाही देणार? मी जे कार्य हातात घेतलय ते देवानी ठरवलय आणि म्हणूनच आज ते स्वत: माझ्या पाठीशी उभे आहेत मला माहीत आहे हे ऐकुन तुमचा विश्वास बसलेला नसणार पण आज जी परिस्थीती आपल्या समोर आली आहे ती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे.”



सगळे जण नुसते शांत ऐकत असतात कुणालाही आपण यावर काय बोलाव तेच सुचत नाही सगळे सुन्न झालेले असतात. तेवढ्यात परत वेदांगी सगळ्यांना विचारते.


वेदांगी- “तुम्ही असे शांत का? काहीच का बोलत नाही काही तरी बोला.”


परत फक्त शांतता असते. एक भयाण शांतता....


क्रमश:

Post a Comment

0 Comments