घरी पोहोचल्यावर...
सगळे जण वेदांगीची वाट पहातच होते. पण गुरूजींनी सांगितल्यामुळे तीने कुणालाच काही सांगितल नाही. एवढच म्हणाली की, “मला सांगितल गेल आहे की कुणालाच काही सांगु नकोस” एवढ बोलुन वेदांगी आपल्या खोलीत निघुन गेली.
आता वेदांगीच्या मनात विचारचक्र सुरू होते. ती विचार करत करत खोलीत फे-या मारत होती. अचानक तीच्या मनात आल आपण परत एकदा ध्यानाचा अभ्यास करुन बघुत आणि ती स्नान करुन फ्रेश होऊन ध्यानाला बसली.
पहिले दिर्घ श्वास मग १०८ वेळा जप आणि त्या नंतर ती कल्पनेचा अभ्यास करु लागली.
काही वेळा नंतर...
तीला ध्यानात दिसु लागत. ती लहान आहे आणि आपल्या नागलोकात आनंदी आहे ती मस्ती करत असते. आणि अचानक नागलोकातुन तीच सुंदर पृथ्वीकडे लक्ष जात. ती बघते एक वैश्णवीच्या मागे एक भला मोठा काळा कुट्ट मनुष्यरुपी नाग उभा आहे. ती अजुन नीट निरखुन पहायचा प्रयत्न करते.
तर तीला ध्यानात ऐकु येत, “तुला पृथ्वीवर जायच आहे. मी तुला घेउन जाईन पण तुला माझ एक काम कराव लागेल करशील?”
वैश्णवी लगेच आनंदाने म्हणते.
वैश्णवी – “मला काय कराव लागेल देवा?”
देवा. म्हणजेच विषलोकाचा राजा आणि नागराज चिरागच्या आधीचा नागलोकाचा सरदार होता. तो रहस्यमयी पुस्तक ‘नागशास्त्र’ च्या मागावर होता. ब-याचदा त्याने ते पुस्तक हस्तगत करण्याचा प्रयत्न देखील केला होता पण प्रत्येकवेळी काही न काही तरी गडबड व्हायची आणी ते पुस्तक त्याच्या पासुन दुर जायच. पण त्या दिवशी त्याला संधी मिळाली आणि त्याने वैश्णवीला ते पुस्तक घेउन यायला सांगितल तो तीला म्हणाला.
देवा – “तु जर ‘नागशास्त्र’ घेउन आलीस तर मी तुला धरती वर घेउन जाईन बोल आणून देशील मला ते पुस्तक”
वैश्णवी थोडासा विचार करते. आणि आपल्याला धरती वर जायला मिळणार या आनंदात ती लगेच हो म्हणते. आणि पुस्तक घेउन येते. तेवढ्यात वेदांगीच ध्यान तुटत आणि ती जागी होते. बघते तर तीच्या समोर नागराज चिराग मनुश्यरुपात तीचे डोळे उघडण्याची वाट बघत थांबलेले असतात. वेदांगी आपले डोळे चोळते आणि नागराजना बघते.
नागराज वेदांगीला विचारतात.
नागराज चिराग- “मी तुझ्या ध्यानात व्यत्यय तर आणला नाही न. मला तुला खुप महत्वाच सांगायच होत म्हणून तुझी वाट बघत होतो.”
वेदांगी – “हो, बोला न मला ही बोलायच आहे तुमच्याशी पण मला वाटत ईथे नको आपण दुसरी कडे जउत.”
नागराज चिराग “ठीक आहे” म्हणतात आणि दोघ महादेवांच्या मंदीरात येतात.
मंदीरात पोहोचताच...
नागराज चिराग- “तुला माहित आहे आज तुला मी ईथे का आणलय ते?”
वेदांगी एक क्षण आपले डोळे बंद करते आणि एकदम विचारते.
वेदांगी(आपले डोळे उघडत)- “हे आपल पिढीजात मंदीर आहे न दर नाग पंचमीला आपण ईथे येउन महादेवांचा आशिर्वाद घेत असतो माहीत आहे मला.”
ती परत आपले डोळे बंद करते आणि प्रार्थना करु लागते. तस तीला जाणवत आपल्या शरिरात काही तरी बदल होत आहेत. ती आपल्या हाताने स्पर्श करते. तीला आपले दोन्ही हात थंड लागतात आणि एकदम ती आपले डोळे उघडते. तीला दरदरुन घाम फुटलेला असतो. काही क्षण तीला समजतच नाही की आपण जो आत्ता अनुभव घेतला तो कसला होता नेमक काय होत ते. ही सगळी घटना नागराज चिराग बघत असतात. ते तीला म्हणतात.
नागराज चिराग – “बेटा मी तुला या साठीच ईथे घेउन आलो होतो मला अंतर्ज्ञानाने जे समजल ते हेच होत आता हळू हळू तुझ्यात बदल होत जातील आणि काही दिवसातच तु वेदांगी ची वैश्णवी होशील आज तुला जो अनुभव आला हा एक संकेत आहे की आता आपल्याकडे वेळ खुप कमी आहे आणि काम जास्त. बर तुला मला काही तरी सांगायच होत न.”
वेदांगी त्या धक्यातुन सावरलेलीच नसते. तो स्पर्श तीला अजुनही जाणवत असतो आणि तेवढ्यात परत नागराज चिराग तीला भानावर आणतात. आणि तीची भीती कमी करतात.
नागराज चिराग(तीला समजावत)- “अस घाबरुन कस चालेल बेटा आम्ही सगळे आहोत न तुझ्या बरोबर आम्ही तुला काही होउ देणार नाही काळजी करु नकोस सगळ छानच होणार आहे फक्त देवावर विश्वास ठेव घाबरु नकोस विजय सत्याचाच होणार आहे ज्या घटना विधीलीखीत असतात त्या कधीच मिटत नाहीत तु बस आत्मविश्वासाने पुढे चाल बस.”
ती समाधानाने नागराजांकडे बघते. आणि विचारते.
वेदांगी – “नागराज, हे देवा कोण आहेत आज गुरूजीं कडे मला वैश्णवी बद्दल समजल पण जेव्हा मी घरी ध्यानाला बसले होते तेव्हा वैश्णवी बरोबर देवांना ही बघीतल. कोण आहेत हे देवा.”
नागराज चिराग विचारातच पडतात.
क्रमश:

0 Comments