नागशास्त्र एक अद्भुत गाथा (भाग - अकरा )



आश्रमाच्या रस्त्यात...


वेदांगी आश्रमात जायला निघालेली असते. तीची गाडी भरदाव वेगाने जात असते. खर तर तीच चालवण ही जरा फास्ट असतच पण आज जरा जास्तच असत तीच्या मनात एक अधीरता असते जाणून घेण्याची गुरूजींकडे अस काय आहे ज्याची मला मदत होउ शकते. ती त्याच विचारात आपली गाडी वेगाने चालवत असते.


आणि अचानक काही चित्र विचीत्र उडणारी माणस भयाण काळी कभीन्न अशी. त्यांना बघीतल्यावर कुणालाही भीती वाटेल अशी दानवी शक्ती तीचा रस्ता अडवायला तीच्या मागे लागतात. ती भीतीने पुर्णता थंडगार पडलेली असते. पण तरीही तशीच वेगाने आपली गाडी चालवत ती आश्रमाच्या दिशेने जात असते. ती असुरी शक्ती तीचा पाठलाग करत करत तीच्या मागेच असते. कधी मागे कधी आजु बाजुला तीचा रस्ता अडवायला तीचा पाठलाग करत असते.


ती असुरी शक्ती बघुन देवाचा धावा सुरु करते. तेवढ्यात तीला नागराज चिरागचा आवाज ऐकु येतो. नागराज तीला म्हणतात.


नागराज चिराग- “घाबरु नकोस वेदांगी तु पुढे हो मी यांना बघतो.” नागराज वेदांगीला पुढे पाठवुन त्या असुरी शक्तींशी लढायला सुरवात करतात.




दोघांमध्ये खुप लढाइ होते तब्बल दोन तास नागराज आणि असुरी शक्तींमध्ये लढाइ होते. इकडे वेदांगी आश्रमात पोचते.


ऋषी सौभद्रांचा आश्रम...


गुरूजी ध्यानमग्न असतात त्यांना ध्यानातच कळत वेदांगी आश्रमात आली आहे ते तीला आत बोलावतात. वेदांगी गुरुजीं समोर येउन बसते. गुरुजी तीला म्हणतात.


गुरुजी सौभद्र- “आलीस बेटा, ये बैस. तर आज तु आजोबांची डायरी वाचलीस तर.”


वेदांगी- “हो गुरूजी तुम्ही मला एक संदर्भ सांगितला होतात त्याचा अर्थ त्या डायरीत होता. पण गुरूजी मला तर काहीच आठवत नाही. मग हे कस काय?”


गुरूजी सौभद्र(स्मीत हास्य करुन)- “बेटा, जन्म मृत्यु ह्या सगळ्या गोष्टी तो विधाता ठरवत असतो आपण तर फक्त त्याच्या हातातल्या बाहुल्या असतो तो जस आपल्याला नाचवतो तस आपण नाचतो. ह्या सगळ्या गोष्टी तुला हळु हळु समजतील.”


वेदांगी- “पण गुरूजी जर कुठल्या वेगळ्या कारणामुळे माझा म्हणजे रखमा आज्जीचा मृत्यु झाला असेल तर काही तरी मला आठवायला हव न.”


गुरुजी सौभद्र- “तेच तर तुला जाणुन घ्यायच आहे. पण याही पेक्षा अजुन वेगळ काम तुला करायच आहे. त्या विधात्याने तुझ्या नशीबात अस काही लिहुन ठेवलय त्याचा कुणी विचार पण करु शकत नाही. आणि हा मार्ग देखील सोप्पा नाहीये यात खुप अडथळे निर्माण केले गेले आहेत त्यासाठी तुझ्या शक्ती जागृत होण खुप गरजेच आहे. आणि मी स्वथ:ला खुप भाग्यवान समजतो त्या विधात्याने तुला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मला सोपवली आहे.”


वेदांगी- “गुरुजी तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. मी पण खुप उत्सुक आहे ह्या नवीन मर्गावरुन प्रवास करायला.”


गुरुजी हसतात आणि म्हणतात.


गुरुजी सौभद्र- “ठीक आहे मग पहिले नीट मांडी घालुन बैस आणि आपले डोळे मिट आपण आज पासुनच तुझ्या नवीन प्रवासाची सुरवात करु.”



वेदांगी गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे आपले डोळे मिटते.


क्रमश:
 

Post a Comment

0 Comments