डायरी वाचुन झाल्यावर वेदांगी खोलीतुन बाहेर येते आणि डायरी आज्जीला देत सगळ्यांना उद्देशुन सांगते.
वेदांगी(डायरी देत)- “ही फक्त एक डायरी नाहीये. हा माझाच पुर्व इतिहास आहे. यात जे दिलय त्यावर तर विश्वासच बसत नाही. (थोड थांबून). रखमा आज्जीचा मी पुर्नजन्म आहे. यात एक खुप मोठ रहस्य लिहून ठेवलय. माझ्या उद्देशा बद्दल पण अजुन देखील लिंक्स लागत नाहीये. पण आज्जी हे सगळ जरी खर असल तरी एक आहे मला या डायरीचा खुप उपयोग झाला एक कलाटणीच मिळाली आहे माझ्या प्रोजेक्टला तुझे आभार कसे मानु तेच कळत नाही बघ.”
दुर्गाबाइ जरा थांबुन तीच्याशी बोलतात.
दुर्गाबाइ(जरास थांबुन)- “बेटा तु माझे आभार मानावेस म्हणून तुझी मदत केली नाही मी मला पर्मेश्वरावर पुर्ण विश्वास आहे आणि तुझ्यावर सुध्दा किती ही संकट आली तरी तु डगमगणार नाही हे मला माहित आहे. तरी बेटा आपली काळजी घे आमचे सगळ्यांचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तुझ कल्याण हो.”
सगळेच एकमेकांकडे बघुन स्मीत हास्य करतात. वेदांगी मनात विचार करते. “आपण आता श्रीधर नागराजांची मदत घ्यायला हवी पण त्या आधी गुरुजींकडे अस काय आहे ज्यामुळे मला त्यांची मदत होइल ते बघाव लागेल. आज वाढदिवस रहस्य शोधण्यातच गेला आता सकाळ काय नविन घेउन येते बघुत”
वेदांगी विचारच करत असते की, तीला हॉल मध्ये शोच्या कुंडीत नागराज चिराग दिसतात. नागराज चिराग हे नागलोकातील एक विश्वसनीय नागांपैकीच एक असतात आण हे तेच नाग देवता असतात ज्यांना लहानपणी वेदांगीने आपल्या वडिलांपासुन वाचवलेल असत. वेदांगी त्याना निरखुन बघते तर तीला लगेच ते ओळखु येतात. नागराजांना बघुन ती ओरडणारच असते तेवढ्यात नागराज तीला सांगतात. “मी तुमच्या सगळ्यांच्या रक्षणा साठी थांबलोय. माझ्यावर नागराजांनी तुमच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली सोपवली आहे. जर तु आवज करशील तर तुमच्या सगळ्यांवर संकट येईल कृपया मला तुझ्या खोलीत ने तुला आम्ही अस संकटात सोडु शकत नाही आता तुझी खुप काळजी घ्यावी लागणार आहे आम्हाला. कारण आता ती वेळ जवळ आली आहे. ‘ती वेळ’ आता तुला प्रत्येक रहस्य समजायला लागतील आम्ही तुला ती रहस्य सांगुत पण त्या साठी मला तुझ्या बरोबर असण गरजेच आहे. म्हणून मला आत घे”
हे ऐकताच वेदांगीला दरदरुन घाम फुटतो एका नागाला आपल्या खोलीत ठेवायच या विचारानेच तीचा थरकाप उडतो. पण वेळीच स्वथाला सावरुन ती कुणाच लक्ष नाही न हे बघुन हळुच नागदेवतांना कुंडीतुन उचलुन आपल्या खोलीच्या दिशेने सोडते. नागराज चिराग लगेच तीच्या खोलीत निघुन जातात.
वेळ रात्रीची...
काही वेळा नंतर वाढदिवस साजरा करुन सगळे आपापल्या खोलीत झोपायला निघून जातात. पण वेदांगीला मात्र झोप लागत नाही ती सारखी नाराजांच्याच विचारात मग्न असते. आणि विचार करता करताच झोपी जाते.
वेळ सकाळची...
सकाळचे ८ वाजलेले असतात....
रात्री विचार करता करता वेदांगीला कधी झोप लागते कळतच नाही. सकाळी अचानक तीला जाग येते आणि ती खडबडून जागी होते. बघते तर सकाळचे ८वाजलेले असतात ती लगेच तयार होते देवाला नमस्कार करते बाकींच्याना नमस्कार करते. आणि नाश्ता करुन गुरुजींच्या आश्रमात जायला निघते.
क्रमश:
0 Comments