गुरूजी सौभद्र- “एक दिर्घ श्वास घे. आणि सोड परत श्वास घे सोड. आता एक कल्पना कर एक सुंदर जंगल आहे. आणि तु त्या जंगलात आपल्या मैत्रीणींबरोबर खेळती आहे. तुझ लहानपण तु तुझ्या लहानपणाचा अनुभव घेतीयेस. त्या लहानपणात जा. लहानपणीच्या गमती जमतींचा अनुभव घे कल्पना कर बघ जरा नीट निरखुन काय दिसतय तुला.”
ती आपले डोळे बंद करुन बघायला सुरवात करते. पण गुरूजींनी तीला जे आदेश दिलेले असतात ते न दिसता तीला पुर्ण नागलोक दिसु लागतो. तीथल तीच बालपण तीच्या सख्या नागराज नागराणी त्यांच प्रेम ती अनुभउ लागते.
काही वेळा नंतर...
वेदांगी हळु हळु आपले डोळे उघडते. आणि चोळते.
गुरूजी तीला विचारतात.
गुरूजी- “कस वाटल तुला वेदांगी? तु काय अनुभव घेतलास?”
वेदांगी- “गुरुजी तुम्ही मला जे काही सांगत होतात ते सगळे आदेश मला समजत होते. पण कल्पनेत जे काही मी पाहिल ते अगदीच वेगळ होत.”
गुरुजी – “अच्छा काय नेमक बघितलस तु कल्पनेत सांगशील”
वेदांगी – “मी पाहिल की, मी एका खुप सुदंर जंगलात आहे. माझ्या बरोबर काही लहान मुली आहेत मी आणि त्या मुली लपंडाव खेळतोय मी नागराज श्रीधरना सुध्दा कल्पनेत पाहील त्यांच्या बरोबर एक राज पोषाख परिधान केलेली स्त्री देखील मी पाहिली. पण ती जागा महाल सारखी ती स्त्री मी या आधी कधी पाहीली नव्हती गुरुजी. पण ते सर्व मला बघितल्या सारख वाटल अस कस कोण आहेत त्या.”
गुरूजी – “ बेटा तुला हे समजल की, तु रख्माबांइंचा पुढचा जन्म आहेस तुला हे ही समजल त्या एक नागकन्या होत्या पण तु हा संदर्भ नाही लाउ शकलीस जे तुझे रक्षण करत आले ज्यांनी तुझ्या बरोबर नागदेवता चिरागना ठेवल जे फक्त तुलाच दीसत असतात त्यांच्याशी तुझा कही संबंध असु शकतो.”
एक क्षण वेदांगी चाटच पडते. तीला आपण काय बोलाव तेच कळत नाही. जरा वेळ विचार करुन ती गुरुजींना म्हणते.
वेदांगी- “म्हणजे नागराज श्रीधर माझे पिता आहेत?”
गुरूजी- “होय बेटा नागराज श्रीधर तुझे पिता आहेत. आणि रखमा हे तुझ्या पणजोबांनी तीला दिलेल नाव होत पण तीच खर नाव वैश्णवी होत.”
वेदांगी(उत्सुकतेने)- “वैश्णवी?”
गुरूजी- “होय, वैश्णवी. वैश्णवी खुप चंचल मनाची होती आणि हुशार देखील होती तीची एक शोधक वृत्ती होती. कुठल्याही विषया बद्दल तीला कळाल की लगेच तीची शोधक वृत्ती जागी व्हायची आणि त्या विषया पर्यंत ती पोहोचायचा प्रयत्न करायची. असच तीला एकदा धरती वरील सौंदर्या बद्दल कळाल आणि ती कुणाला ही न सांगता नागलोकातुन धरतीवर आली पण येताना ‘नागशास्त्र’ घेउन आली. जेव्हा हे भयासुर ला समजल तेव्हा त्या पुस्तकासाठी तो तीच्या मागे लागला पण वैश्णवी त्याच्या पेक्षा खुप चपळ होती तीने आपल्या चपळाइने आणि हुशारीने आपला जीव वाचवला आणि त्या पुस्तकाला ही वाचवल पण पुढे ते पुस्तक त्या संग्रहालया पर्यंत कस पोचल ते नाही माहीत.”
वेदांगी- “गुरूजी हे सगळ तुम्हाला कस माहीत?”
गुरूजी(हसून)- “मला कस माहित? ते ही कळेल तुला लवकरच. आता आजच्या पुरत एवढ बस आहे. आज तुला एक दिक्षा देतो त्याला शक्तीपात दिक्षा म्हणतात. आज मी तुझ्या कडुन जो अभ्यास करुन घेतला त्या आधी तुला एक जप करायचा आहे तो १०८ वेळा असेल नंतर कल्पनेचा अभ्यास करायचा आहे. तो मंत्र आहे ‘ओम नागेंद्राय नह:. तुझ कल्याण हो”
क्रमश:

0 Comments