थोडासा विचार करुन वेदांगी आपल्या मनातल सांगायला सुरवात करते.
वेदांगी(थोडासा विचार करुन)- “तु खर म्हणती आहेस आज्जी, एक गोष्ट आहे माझ्या मनात. तीच मला पुर्ण करायची आहे. एक अस प्रोजेक्ट ज्यामुळे आपल्या घराण्याचा तर उध्दार होइलच पण जस गुरुजींनी सांगितलय जगत कल्याणासाठी माझा जन्म झालाय ते ध्येय ही पुर्ण होईल. पण यात मला तुमची सगळ्यांची सुध्दा साथ लागणार आहे आणि अशिर्वाद देखील. असेल न माझ्या पाठीशी तुमचा आशिर्वाद.”
स्वर्णलता(काळजीने)- “अरे, बेटा आमचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी कायम असणारच आहे. पण आम्हाला कळू तर दे तु नेमक काय करतीयेस ते. बघ उगीच आमच्या जीवाला घोर नको लाउस ह तु जे आहे ते स्पष्ट सांग आम्हाला.”
वेदांगी- “आई, माझ्याशी सुध्दा नाग साप बोलतात. लहानपणा पासुन.”
स्वर्णलता एकदम ओरडते.
स्वर्णलता(घाबरुन)- “काय...?”
वेदांगी- “बघ म्हणून मी आजपर्यंत कुणाला सांगितल नव्हत हे. मला माहित होत. असच होणार म्हणून तर आज पर्यंत सांगितल नाही कुणाला.”
दुर्गाबाइ- “गुरूजी सांगत होते वनसंमुळे हीचा जन्म झालाय बेटा आम्हाला सविस्तर सांग नेमकी सुरवात कुठून आणि कशी झाली ते. (सगळ्यांना उद्देशुन) आणि हो आता कुणी ही हीला अडवणार नाही कळल. गुरुजीनी काय सांगितल होत आठवतय न सगळ्यांना”
सगळे शांत बसतात. आणि वेदांगी सांगायला सुरवात करते. पण ती सांगत असताना कुणी तरी असत जे तीच बोलण चोरुन ऐकत असत.
वेदांगी- “आई, तुला आठवत एक दिवस मी अभ्यासाला बसलेले होते. आणि अचानक मी घाबरुन तुम्हाला सगळ्यांना आवाज दिला तेव्हा एक खुप मोठा नाग माझ्या जवळून जात होता बाबांनी ते पाहील आणि ते त्याला मारायला निघाले होते. तेव्हा मी जोरात ओरडले होते “त्याला सोडा त्याला जाउ द्या””
स्वर्णलता- “त्याच काय मग,”
वेदांगी- “तो नाग मला याचना करत होता, तो खुप घाबरलेला होता. मला आवाज देत होता पण मला कळत नव्हत कोण बोलतय सगळीकडे बघीतल्या नंतर मला समजल तो नाग माझ्याशी बोलत होता म्हणत होता. माझ्या प्राणाची रक्षा कर मी इथे परत येणार नाही तेव्हा मला समजल. आणि मी बाबांशी बोलले. पण यानंर मी असे खुपदा अनुभव घेतले तेव्हा ठरवल आपण याला एक प्रोजेक्ट म्हणून घ्यायच आणि या सगळ्यांचा तपास लावायचा. तुझ्या कडून गोष्ट ऐकण आजोबांच्या डायरी बद्दल विचारण हा ही एक त्याचाच भाग होता. आता सांगा तुम्ही मला मदत कराल न.”
अशुतोश राव(काळजीने)- “बेटा, पण गुरुजींच सांगण आणि आमची तुला मदत करण यात जमीन आसमानचा फरक आहे. तु पोर आहेस आमची तुला अस संकटात कस टाकु आम्ही.”
दुर्गाबाइ- “आशुतोश तुझी भीती मी समजु शकते. पण जर हे विधीलीखीतच असेल तर त्याला कोण काय करणार आहे. आणि आता तीने हे कार्य आपल्या हातात घेतलच आहे तर आपण सगळ्यांनी तीला पुर्ण सहकार्य करायच. आणि आपण हे का विसरतोय आपले गुरुजी त्रीकाल ज्ञानी आहेत जेव्हा ते स्वत: सांगत आहेत तेव्हा यामागे नक्कीच त्या परम पिता परमेश्वर ची काही तरी योजना असणार एवढ नक्की. तेव्हा आपण सगळ त्याच्यावर सोपवुन हीला मदत करु काय?(वेदांगीला उद्देशुन) बेटा तुला आमच्या कडून कुठली मदत हवी आहे?”
वेदांगीला आज्जीच्या बोलण्याचा खुपच आनंद होतो ती लगेच आज्जीला म्हणते.
वेदांगी(आनंदुन)- “थँक्यु सो मच, आज्जी (सगळ्याना). हे बघा मला माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना माझी काळजी वाटण साहजीक आहे. पण जी घटना आधीच ठरवलेली असते त्याला आपण काही करु शकतो का ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्या आपण देवांवरच सोपवायला हव्यात न आणि जर का त्यांनीच मला या कार्यासाठी निवडलय तर रक्षण देखील तोच करेल बरोबर की नाही. तुम्ही काळजी करु नका. (आज्जीला) आज्जी मला आता सगळ्यात आधी आजोबांची डायरी लागेल देशील.”
दुर्गाबाइ थोडस हसतात आणि आपल्या कपाटाची चावी वेदांगीला देतात. हे सगळ एक व्यक्ती बघत असते. ती म्हणजे ‘भयासुर’.
क्रमश:

0 Comments