"संकट कुणाच्या आयुष्यात नसतात. पण जो संकटांचा सामना करतो तोच आयुष्यात विजयी होतो."
चित्राच आयुष्य ही काहीस असच होत. चित्रा. तुमच्या माझ्या सारखीच एक मुलगी. तिशीच्या आसपास असलेली. चित्राच आयुष्य खूप ऐशो आरामातल होत अस नाही पण स्वतःहाच्या आणि आपल्या घरच्यांच्या गरजा पूर्ण करू शकेल इतकी तिची मिळकत होती. त्यामुळे चित्राची फॅमिली समाधानी होती.
चित्राच्या वडिलांचा जॉब गेलेला होता. त्यातून आईचे आजारपण आणि दोन भावांच शिक्षण ह्या सगळ्यांची जबाबदारी चित्रावरच आलेली होती. तीन भावंडांमध्ये चित्रा सगळ्यात मोठी होती मग दोन्ही भावंडे होती.
चांगली शिकलेली संस्कारी चित्रा गुणी आणि चुणचुणीत मुलगी होती. ऑफिस असो किंवा घर चित्रा नेहमी आपली छाप टाकत असे कुठेही बघा चित्राच कौतुक झालंच म्हणून समजा. चित्रा मनाने खूप चांगली मुलगी होती. तिला प्रत्येकाच्या अडी अडचणीला मदत करायला आवडत असे. त्यामुळे कुणालाही मदतीची गरज भासली की लगेच चित्राला बोलवलं जायचं.
चित्रा समजूतदार आणि मेहनती होती. तिची खूप काही स्वप्नही होती पण ती घरच्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतकी अडकून पडली होती की तिला स्वतःकडे बघायला कधी वेळच मिळाला नाही.
तिलाही आयुष्यात आपले छंद जोपासायचे होते स्वतःकडे लक्ष द्यायचं होत एक खूप मोठं नाव कमवायच होत. पण तिच्या घरावर एका मागून एक अशी काही संकट येत गेली की ती संकटे निस्तरता निस्तरता चित्रा स्वतःलाच हरवून बसली होती. कमी वयात जबाबदाऱ्या पडल्या मुळे जणू काही तिच्यातला आत्मविश्वासच ती गमवून बसली होती.
नेहमी उत्साही चंचल राहणारी चित्रा आता आपल्यातच राहू लागली. तिला नेहमी आपल्या घराची घरातल्या लोकांची काळजी वाटायची आणि सारखा एकच प्रश्न त्रास द्यायचा आपल्या घराच कस होणार? त्यामुळे ती खूप खचून गेली होती. एक दिवस असच विचार करत बसलेली असताना अचानक चित्रा जागेवरून उठते आणि रस्त्याच्या अगदी मधोमध चालायला सुरुवात करते ती जबाबदाऱ्यांच्या ओझ्याला कंटाळली होती तिला शुद्ध ही नव्हती की आपण हे काय करतोय आणि याचे पुढे काय परिणाम होतील आपल्या आई बाबांचं काय होईल? याचा कुठलाही विचार तिच्या मनाला ही शिवला नाही ती अशीच पुढे जात राहिली आणि अचानक मागून कारचा हॉर्न वाजतो ती एवढी आपल्या विचारात मग्न होऊन चालत असते की तिला कळत ही नाही आपण रस्त्याच्या मधोमध कधी आलो. चित्रा एकदम भानावर येते आणि स्वतःला सावरत घरी यायला निघते थोडं दूर जाताच तिला एक रिक्षा दिसते आणि ती रिक्षात बसून घराच्या दिशेने निघू लागते.
रिक्षात बसल्या बसल्या चित्रा घडलेल्या प्रकाराचा विचार करायला लागते.(मनाशीच) "हे आपण आज काय करत होतो. आपल्याला काही झालं असत तर? जबाबदाऱ्याच आहेत न घेतल्या थोड्याश्या अंगावर तर कुठे बिघडलं. पण जर आपल्या कडून हा गुन्हा आज घडला असता तर? आपल्या आई वडिलांकडे भावाकडे कोणी बघितलं असत. नाही आपण हार मानता कामा नाही आपण यातुन मार्ग काढुच प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच न शोधू आपण ते उत्तर." असा विचार करता करता चित्रा मोबाईल मधील युट्युब बघू लागते व्हिडीओ चेक करताना अचानक तिला आकर्षण नियमाचे व्हिडीओ दिसतात. ती ते व्हिडीओ खूप लक्ष देऊन बघते. तिला समजत आपण कुठे चुकतोय ते. ती घरी पोहोचते ती खूप आनंदी असते खुश असते. कारण तिला आनंदी राहण्याचा मार्ग गवसलेला असतो. ती त्याच आनंदात रिक्षावाल्याला पैसे देऊन त्याचे आभार मानते आणि एक प्रण घेते. "आजपासून आयुष्यात कितीही संकट आली तरी मी त्या संकटांना भिणार नाही त्यांचा बाऊ करणार नाही आलेल्या प्रत्येक जबाबदारी चा आनंदाने स्वीकार करून त्या पूर्ण करीन" असा प्रण घेऊन चित्रा आनंदाने घरात प्रवेश करते. आणि प्रेमाने सगळ्यांना आलिंगन देते. तसेच सगळ्यांचे मनापासून आभार मानते.

0 Comments