दुर्गाबाइ पुढे सांगु लागतात.
दुर्गाबाइ- “आणि गावाकडे घेउन आले पुढे ती इकडे आपल्याच घरी राहु लागली त्याकाळी बाबांनी तीच्या घरच्यांचा खुप शोध घेण्याचा प्रयत्न केला पण शोध लागला नाही आणि ती ह्यांची बहीण रखमा बनली हे नाव सुध्दा तीला बाबांनीच दील होत. त्यांच्या मध्ये एक अलौकीक तेज होत. पण एक गोष्ट त्यांची विलक्षण होती ती म्हणजे त्या कुणाशीच बोलत नसत सगळे त्यांना मुकी समजायचे. चिडवायचे पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता त्या दिवसभर नागदेवतेची पुजा करत बसायच्या जस काही त्यांनी एक प्रकारचा काही तरी मिळवायचा ध्यास घेतला होता काही तरी हव होत त्यांना. अश्याच त्या दिवस रात्र पुजेत मग्न रहात असत. हळु हळु हे आणि रखमा बाइ म्हणजे माझ्या वनस मोठे होउ लागले त्यांना कळत नव्हत अश्यातला भाग नव्हता त्या आईंना सगळी मदत देखील करायच्या. पण सगळ न बोलता. आणि एक दिवस ह्यांच्याशी बोलुन अचानक कुणाला ही न सांगता त्या कुठे गेल्या हे आज पर्यंत एक रहस्यच आहे. त्यांनी ह्यांना देखील काय सांगितल हे ही फक्त त्यांनाच माहित होत जे त्यांनी कधी कुणाला सांगितल ही नाही.”
लगेच वेदांगी दुर्गाबाइंना विचारते.
वेदांगी- “मग आज्जी तुला इतक कस माहित? आणि तु मला एकदा बोलली होतीस बघ आजोबांना त्या काळी सुध्दा डायरी लिहायची आवड होती कदाचीत त्यांनी त्यात काही रखमा आज्जी बद्दल लिहील असेल. तुला त्यांची डायरी कधी वाचावीशी वाटली नाही का?”
दर्गाबाइ हसुन उत्तर देतात.
दुर्गाबाइ(हसुन)- “मला वेडीला कसल आलय ग शिक्षण त्या काळी नुसत शाळेकडे बघीतल तरी घरचे ओरडायचे. त्यातुन गरिबी ह्यांचच शिक्षण काटकसर करत झालेल. तुमच्या सारखी परिस्थीती कुठे होती त्यावेळेस.”
पण अजुनच अगतिग होउन ती परत आज्जीला विचारते जस काही तीला शोध घ्यायचा एक ध्यास लागला आहे. आज्जीला तीची ती ओढ समजते आणि तीला गुरुजींचे शब्द आठवतात. न रहाउन दुर्गाबाइ तीला विचारतात.
दुर्गाबाइ(थोडा विचार करुन)- “बेटा, तुला राग येणार नसेल तर एक विचारु का?”
वेदांगी- “आज्जी, तुझ्या बोलण्याचा कधी राग आलाय का ग मला, तुला काय विचारायच आहे ते विचार”
दुर्गाबाइ- “बेटा, (थोडस थांबुन). तु कुठल चुकीच काम तर करत नाहीएस न जे तु करायला नाही पाहीजेस अस.?”
वेदांगी थोडी संभ्रमात पडते आणि म्हणते.
वेदांगी- “नाही आज्जी, अस काही नाही मला सांग मी कधी तरी चुकीच वागली आहे का आज पर्यंत.”
दुर्गाबाइंना तीची काळजी वाटते आणि त्या काळजीत त्या तीला म्हणतात.
दुर्गाबाइ(काळजीने)- “तस नाही ग, बेटा तुला आज ओळखत नाही न मी म्हणून थोडी काळजी वाटली ग आणि हे जे आपल्या घरात सुरु आहे त्यामुळे अजुन काळजी वाटली बस. तुझ्या नुसत्या हालचालीं वरुन मी तुझ्या मनात काय चालु आहे हे सांगु शकते. चल बोल पटकन आता.”
क्रमश:

0 Comments