गुरुजी सौभद्र तारेग्रह बघुन वेदांगीची पत्रीका बघायला लागतात. आणि त्यात त्यांना एक रहस्य कळत ते आशुतोश रावांना विचारतात.
गुरुजी(ग्रहांची आकडेमोड करत)- “तुमच्या पुर्वजांमध्ये कोणी नागदेवतांची निष्ठेने पुजा करायचे का? जी काही कारणामुळे निष्फळ ठरली. आहे का कुणी अशी व्यक्ती?”
हे ऐकुन सगळे एकमेकांकडे बघु लागतात. तेवढ्यात वेदांगीच्या आज्जीला दुर्गाबाइंना आठवत. त्या गुरुजींना सांगतात.
दुर्गाबाइ- “हो, आठवल मला आई आम्हाला नेहमी सांगायच्या जेव्हा त्यांच नवीन लग्न झाल होत तेव्हा घरी ह्यांची मानलेली बहीण जीला बाबांनी सांभाळलेल होत. त्या नाग देवतांच्या उपासक होत्या आणि म्हणे त्यावेळी नाग त्यांच्याशी बोलत ही असत. पण नंतर त्यांच काय झाल त्या कुठे गेल्या कुणालाच माहीत नाही. पण गुरुजी त्यांचा इथे काय संबंध इतकी जुनी गोष्ट आत्ता का?”
गुरुजी(चिंतेत येउन)- “आशुतोश राव, मी तुमच्या गुरुंच पद तुमच्या आजोबांपासुन भुषवतोय आजपर्यंत माझा सल्ला घेतल्या शिवाय तुमच्या कडे कुठल ही काम होत नाही आणि म्हणुनच मला तुम्हाला सांगांवस वाटतय जस मी म्हणल होत आता तुमच्या पोरीला त्रास सुरु होणार आहे. हीच्या आयुष्यात खुप काही घटना घडणार आहेत हीला अशी लोक ही भेटतील जी पुढे चालुन हीला मदत करतील आणि हीला त्रास देखील देतील सध्याचा हीचा काळ खुप आव्हानात्मक आहे म्हणून हीची काळजी घ्या पण ही काहीही करत असेल तीला अडवु नका तीला करु द्या मी पत्रीका बघुन इतकच सांगेन हीचा जन्म जगत कल्याणा साठी झाला आहे आणि हे त्या माईच फळ आहे ज्यामुळे हिचा या घरात जन्म झाला आहे.”
सौभद्र गुरुजींच बोलण ऐकुन सगळेच अगदी वेदांगी सुध्दा अचंबीत होते. पण लगेच भानावर येउन सगळे गुरुजींच्या पाया पडतात. आणि गुरुजी आपल्या आश्रमाकडे निघुन जातात.
वेदांगीच विचारचक्र सुरु होत आणि त्यातच ती दुर्गाबाइंना विचारते.
वेदांगी- “आज्जी, मला रखमा आज्जी बद्दल सांग न ग मी खुपदा आपल्या घराण्याच्या इतिहासात ऐकलय आज्जी बद्दल. प्लीज सांग न”
याला बाकीचे लोक ही दुजोरा देतात. आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर दुर्गबाइ रखमाबाइंचा इतिहास सांगु लागतात.
दुर्गाबाइ- “बरं, ही गोष्ट आहे ह्यांच्या लहानपणाची. जेव्हा माझे सासु सासरे म्हणजे आशुतोशचे आज्जी आजोबा आणि हे तीघ बैलगाडीतुन गावाकडे जात होते. तेव्हा अचानक खुप पाउस पडत होता आणि अंधारही होता तेव्हा अचानक बाबांना एक छोटी मुलगी पावसात भिजत असलेली दीसली त्यांनी आजुबाजुला कोणी आहे का बघीतल पण त्यांना कुणीच दीसल नाही. त्यांनी आवाजही दीला पण तरी तीथे कुणीच नव्हत. तेव्हा बाबांना वाटल ही एवढीशी लहान पोर एकटी कशी रहाणार म्हणून त्यांनी तीला आपल्या बरोबर घेतल.”
क्रमश:
0 Comments