नागशास्त्र - एक अद्भुत गाथा (भाग - पाच )

काही वेळा नंतर...

वेदांगी आपल्या खोलीत झोपलेली असते. बरोबर १२ वाजता सगळे तीच्या खोलीत येतात आणि एकदम ओरडुन तीला वाढदिवसाच्या सुभेच्छा देतात. ती एकदम दचकते आणि आनंदाने उठते. घरातली सगळी जण तीला विश करतात ती मनात म्हणते.

वेदांगी(मनात म्हणते)- “अरेच्च्या प्रोजेक्टच्या नादात मी माझा वाढदिवस सुध्दा विसरले अनयला तरी लक्षात आहे की नाही कोण जाणे जाउ दे त्याला उद्या आठवण सुध्दा करुन देणार नाही मी.” ती विचार करतच असते की, अनयचा फोन येतो. आणि तीच्या चेह-यावर एक गोड हसु येत कारण अनय तीचा फक्त एक असिस्टंट नसतो तर तीच्यासाठी खास ही असतो वेदांगी आणि अनय एकमेकांशी बोलु लागतात तस सगळे खोलीतुन बाहेर जातात.

वेळ सकाळची...

८ वाजलेले असतात...

आज वेदांगीचा वाढदिवस म्हणून ती सकाळी लवकर उठते आपल आवरते सगळ्यांच्या पाया पडते आणि मंदिरात दर्शनाला जाते. ती दर्शन घेतच असते की, नागराज श्रीधर तीला सावध करायला आणि आशीर्वाद द्यायला मंदीरात प्रगट होतात.

नागराज श्रीधर- “(वेदांगी प्रदक्षिणा मारत असते. तेवढ्यात). बेटा वेदांगी.”




वेदांगी मागे वळुन पहाते. आणि..

वेदांगी- “तुम्ही परत?”

नागराज श्रीधर- “हो, बेटा मीच तुला परत सावध करायला आलो आहे. आज तु २५ वर्षाची झालीस न तुमच्या मध्ये उपहार देतात न माहीत आहे मला. आज माझा आशीर्वाद म्हणून मी तुला ही एक माळ देत आहे याला सदैव आपल्या जवळ ठेव हरउ नकोस हा नुसता माझा आशीर्वाद नाही तर ही एक शक्ती आहे तुझी शक्ती काही दिवसातच तुला या शक्तीचा प्रत्यय येइल. आज घरी गुरुजी येणार आहेत न भेट त्यांना ते सांगतील पण एकटीच भेट हं. आणि मी सांगितलेल कायम लक्षात ठेव तुझ कल्याण हो.” नागराज श्रीधर एवढ बोलुन अदृष्य होतात आणि आपल्याच विचारात मग्न होत माळेकडे बघुन वेदांगी घरी परतते.

घरी परतल्यावर...

इकडे पटवर्धनांनकडे गुरुजींच्या स्वागताची तयारी सुरु असते. सगळे तयारीत मग्न असतात ते बघुन वेदांगीला समजत ही तयारी गुरुजींसाठी आहे ती एकदम विचारात पडते घरी गुरुजी येणार आहेत हे त्यांना कस समजल. ती लगेच आपल्या हातातल्या माळेकडे बघते. तर ती माळ एकदम चमकते. आणि तीला काही समजण्याच्यात आत तीच्याकडे गुरुजींच आगमन होत. गुरुजी सौभद्र जवळ जवळ २५ वर्षां नंतर पटवर्धनांकडे आलेले असतात. ते पुर्ण घरावर एक नजर फिरवतात आणि लगेच सगळे त्यांच्या पाया पडतात ते बघुन वेदांगी सुध्दा गुरुजींच्या पाया पडते. तीला बघताच गुरुजी विचारतात.

गुरुजी सौभद्र- “तुला जे हव आहे ते मिळाल बेटा?” ती गुरुजींकडे बघतच रहाते. आपण काय बोलाव तेच तीला कळत नाही तेवढयात परत गुरुजी तीला म्हणतात.

गुरुजी सौभद्र- “तुला जे हव आहे ते माझ्याकडे आहे. तु आश्रमात ये आपण तीथे बोलुत” गुरुजींच कोडयात बोलण कुणालाच समजत नाही सगळे एकमेकांकडे बघत राहतात. तेव्हा गुरुजी स्वर्णलताला वेदांगीची पत्रीका मागतात.

क्रमश: 

Post a Comment

0 Comments