नागशास्त्र - एक अद्भुत गाथा (भाग - चार )


आपल्या खोलीत आल्यावर...

वेदांगी ऐकलेल्या गोष्टीची लींक जोडण्याचा प्रयत्न करत करत खोलीत विचार करत असते. ती प्रत्येक छोटयातल्या छोटया धाग्याचा विचार करते. आणि एका वहीत नोंद करुन ठेवते. त्या धाग्यांचा विचार करता करता तीला रमण व्दिपची माहीती मिळते. तसेच हे ही समजत की नागराज आता रमण व्दिपवर देखील नाहीत. ती लगेच आपल लॅपटॉप काढते आणि रमण व्दिपची माहीती शोधु लागते.

वेदांगी(लॅपटॉप मध्ये माहिती शोधत मनाशीच पुटपूटते)- “ह, तर रमण व्दिप म्हणजे आत्ताच सुनरख आहे तर. अछा आपण इथे जर गेलो तर काही तरी आपल्या हाती लागु शकत. हं...(लॅपटॉप कडे बघत तीच विचरचक्र सुरू असतात.)”

ती लगेच अनयला काय काय घडल ते सांगते. पण ते ऐकुन अनय मात्र हसु लागतो. ते बघुन वेदांगीला जरा त्याचा रागच येतो आणि ती फोन ठेउन देते.

वेळ रात्रीची...

सगळे जेवण उरकुन झोपण्याच्या तयारीत असतात. वेदांगी मात्र नागराज श्रीधरनी सांगितलेल्या रहस्याच्या विचारात मग्न असते. आणि तसच आपल्या खोलीत निघुन जाते.

इकडे स्वर्णलतापासुन मात्र आपल्या मुलीची चलबीचल लपत नाही आणि तीला एकदम आपल्या गुरुजींचे शब्द आठवतात.

स्वर्णलता(काळजीत)- “ही कुणी साधारण मुलगी नाहीये हीच्यात एक अलौकिक तेज आहे हीच्या नुसत जन्माला येण्याने ढग गडगडु लागले मुसळधार पाउस पडु लागला तर पुढे ही मोठी झाल्यावर काय होइल ही नक्कीच साधारण मुलगी नाहीये आणि म्हणूनच हीची जास्त काळजी देखील घ्यावी लागेल. हीचा जन्म मुळ नक्षत्रात झाला आहे अशी मुल अपार शक्तींची धनी असतात भविष्यात हीचे जीतके हितचिंतक असतील तितकेच शत्रु देखील असतील तरी देखील ही सगळयांना प्रेमाने सांभाळून घेणारी असेल. आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे हीच्या वयाच्या २५ व्या वर्षा पासुन हीला त्रास सुरु होईल आणि तेव्हाच हीच्या शक्ती जागृत होतील. पण तो पर्यंत हीच्यावर पुर्ण लक्ष ठेवा ही तुमच खुप मोठ नाव करणार आहे हीला वेदांगी नावाने ओळखतील.” ती एकदम दचकते आणि मनाशीच पुटपुटते.

स्वर्णलता- “२५ व्या वर्षापासुन त्रास? आज रात्री १२ वाजता वेदुला २५साव लागेल. म्हणजे गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरणार.” तीच एकीकडे काम चालु असत आणि मनात वेदांगीचे विचार. तेवढ्यात वेदांगीचे वडील आशुतोश राव हॉलमध्ये येतात आणि स्वर्णलताला धीर देत म्हणतात.

आशुतोश(धीर देत)- “आपली वेदु आज १२ वाजता २५ वर्षाची होइल. दिवस किती पटकन निघुन जातात नई. एवढीशी होती पोर आपली कधी मोठी झाली समजल ही नाही. आता तीच्यासाठी स्थळ ही बघायला हवीत. काळजी करु नकोस सगळ ठीक होईल.”

स्वर्णलता लगेच भानावर येते आणि थोडस चिंतेच्या स्वरात बोलते.

स्वर्णलता(चिंतेने)- “लग्नाच? आधी गुरूजींच्या भविष्यवाणीच बघा २५ वर्षांपुर्वी गुरुजी काय म्हणाले होते माहित आहे न. २५व्या वर्षापासुन वेदांगीला त्रास सुरु होईल. मी काय म्हणते उद्या तीचा वाढदिवस आहे तर तीची पत्रीका दाखउया का आपण उद्या गुरुजींना घरीच बोलउ न.”

हे ऐकताच एकक्षण आशुतोशु रावानां आपण काय बोलाव तेच समजत नाही आणि ते जिथल्या तीथे स्तब्ध उभे राहतात त्यांच्या डोळ्या समोर २५ वर्षा पुर्विच सगळ चित्र उभ राहत. त्याच अवस्थेत दोघ एकमेकांकडे बघतात.

क्रमश:  

Post a Comment

0 Comments