नागशास्त्र एक अद्भुत गाथा - भाग तीन

एवढ बोलुन नागराज श्रीधर परत आपल्या स्वस्थानी निघुन जातात पण वेदांगी मात्र विचारात पडते. “ही जी व्यक्ती आपल्या समोर उभी होती ती कोण होती. म्हणजे खरच इच्छाधारी नागांच अस्तीत्व असत? खरच मी जो नाग आत्ता या क्षणी बघीतला तो खरच होता की, माझा भास? आणि ते काय म्हणून गेले? माझ्यात कुठली शक्ती आहे हे कस शक्य असेल. छे आज डोकच काम करत नाहीये.” आपल्याच मनाशी पुटपूटत वेदांगी खोलीत विचार करत करत फे-या मारत असते. आणि अचानक तीला अठवत. “आपल्याला लहानपणी आज्जी कृष्णाची गोष्ट सांगायची खरी” ती लगेच तीच्या आज्जीच्या खोलीत जाते आणि आज्जीला कालीयामर्दनची गोष्ट सांगायला सांगते.

वेदांगी(आज्जीच्या खोलीच दार उघडुन)- “आज्जी, मी आत येउ का? तु काही काम तर करत नाहीस न?” दुर्गाबाई जप करत बसलेल्या असतात. पण नातीचा गोड आवाज ऐकुन माळ ठेउन देतात. आणि म्हणतात.

दर्गाबाइ(आपली माळ ठेवत)- “काही नाही ग चीमणे काही काम करत नाही ह मी आणि करत जरी असले असते तर तुझ्या साठी माझा वेळ मोकळाच आहे. आज खुप दिवसानी या आज्जीची आठवण झालीये बाबा एका मुलीला बोल काय म्हणतेस” वेदांगी हसते आणि म्हणते.



वेदांगी(हसुन)- “काय करु आज्जी अग कामच इतक असतात न त्यातुन आज थोडासा वेळ मिळाला बघ आणि हातात जे काम घेतलय त्याची वाच्यता पण कुठे करु शकत नाही पण इतक आहे हे काम जर पुर्ण झाल तर मात्र हाहाकार उडेल इतक नक्की.”

दुर्गाबाइ- “बरं, करतीयेस न काही तरी कर. मला माहीत आहे तुला नक्की यश मिळेल. बर पण माझ्या कडे काय काम काढलस तु आज? तु अशी नक्कीच येणार नाहीस ह माहीत आहे मला बोल आत्ता.”

वेदांगी(थोडस चिडक्या स्वरात)- “हे काय ग, आज्जी अस का म्हणतेस बर बाबा येत जाइन तुला आता भेटायला ह. बर ऐक न आज गोष्ट ऐकण्याचा खुप मुड झालाय लहानपणी तु मला ती कृष्ण आणि कालीया नागाची गोष्ट सांगायचीस न ती सांग न मला आज प्लीज.” दुर्गाबाइ हसुन म्हणतात.

दुर्गाबाइ(हसुन)- “अग, एवढच न. पण मला सांग आज अचानक तुला गोष्टीची कस काय आठवण झाली?”

वेदांगी- “अग, असच सांग न प्लीज”

दुर्गाबाइ- “बर, सांगते. ऐक. (आणि वेदांगी लक्ष देउन ऐकु लागते.) पुराणा नुसार कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी कद्रू यांना अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पिंगला, पद्म, महापद्म, शंख, कुलिक, चूड, धनंनजय, आणि कालीया ही मुल होती. कालीया नाग रमण नामक व्दिपवर निवास करत असे. त्यावेळी पक्षीराज गरुड आणि कालीया नाग यांच्यात खुप शत्रुत्व वाढले. आणि कालीया नाग आपल्या पत्नीसह यमुना नदीत येउन राहु लागला. त्याला माहीत होत आपण इथे सुरक्षित राहुत. इथे गरुड देव येउ शकणार नाही. कारण गरुड देवांना तपस्वी सौभरि यांनी शाप दिला होता तपस्वी सौभरि यांनी गरुड देवांना सांगुन देखील त्यांनी यमुना नदीतील माशांना बलपुर्वक खाल्ल होत. म्हणून क्रोधीत होउन तपस्वी सौभरि यांनी गरुड देवांना शाप दिला होता. “जर तु परत इथे येउन माशांना पकडलस तर त्या क्षणी तुला मृत्यु प्राप्त होइल.” हेच कारण होत की कालीया नाग आपल्या कुटुंबासह यमुना नदीत रहायला आला होता. कालीया नाग खुप विशारी होता त्यामुळे पुर्ण यमुना नदी विशारी बनली होती. कालीया नाग यमुना नदीत जवळ कुणीही गेल की त्यांना खात असे त्यामुळे सगळे गोकुळवासी यमुना नदीजवळ जायला घाबरु लागले.


एक दिवस श्रीकृष्ण भगवान आपल्या सवंगडयांसह यमुनाकाठी खेळायला आले आणि खेळता खेळता त्यांचा चेंडु यमुना नदीत जाउन पडला. तस तो चेंडु परत आणायला भगवान श्रीकृष्णांनी नदीत उडी मारली आणि कालीया नागाशी युध्द केल त्या युध्दात कालीया नागाचा पराभव झाला कालीया नागानी कृष्णाची माफी मागितली तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले.

“तु जीथुन आला आहेस परत तीथेच जा” तेव्हा कालीया नाग भगवान श्रीकृष्णाला म्हणतात.

“देवा तुमचे सेवक गरुड देव माझ्या जीवावर उठले आहेत.” तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतात.

“माझे चरण आता तुझ्या मस्तकावर उमटले आहेत जेव्हा ती खुण गरुड देव बघतील ते तुला काही करणार नाही.” हे ऐकताच कालीया नाग आपल्या स्वस्थानी नीघुन जातात. आल का लक्षात”

वेदांगी पुर्ण कथा अगदी लक्षपुर्वक ऐकत असते. ते ऐकुन आता तीच्या डोक्यात वेगळेच विचरचक्र सुरू होतात. आणि ती एवढच म्हणते.

वेदांगी(बाहेर जाता जाता)- “हो आज्जी सगळ लक्षात आल अगदी सगळ.” आणि तीथुन निघून जाते.

क्रमश:

Post a Comment

0 Comments