वेदांगी आज्जीची चावी घेउन खोलीत जाते आणि कपाटातील सामान चेक करु लागते. खुप शोधा शोध केल्या नंतर तीला एक जुनाट अर्धी फाटकी असलेली एक डायरी सापडते. ती ती डायरी घेउन खोलीच्या बाहेर येते. आणि आपल्या खोलीत येउन शांतपणे डायरी वाचायला सुरवात करते.
वेदांगी(डायरीच पान उलटुन)- “पान नं १. आज मला एक माझी छोटी बहीण मिळाली आम्ही तीला घरी घेउन आलो. (पान उलटुन). पान नं २. रखमा आणि मी आज खुप खेळलो पण आज एक विचीत्र गोष्ट ही घडली आमच्या कडे एक नाग निघाला होता तो मला चावणार इतक्यात रखमानी मला वाचवल. ती नागाशी अस काय बोलली काय माहीत तो नाग मला न चावताच निघुन गेला मी आईला हे सांगणार होतो पण तीने मला अडवल. (पान उलटुन). पान नं ३. आज पहिल्यांदा रखमा माझ्याशी बोलली आज मी खुप खुश आहे. आज मला एक सत्य समजलय रखमा कुणी साधी सुधी मुलगी नाही ती असीम शक्तींची स्वामीनी आहे. आणि साक्षात नागदेवतेची मुलगी आहे. यावर कुणी विश्वास ठेवेल की नाही मला माहीत नाही पण हे सत्य आहे. पण एक कोड ही आहे ही धरती वर कशी आली काय आहे हीच रहस्य हे अजुन तरी उलगडायच बाकी आहे. (पान उलटुन). पान नं ४. आज रखमानी एक भविष्य सांगितल. “माझा जन्म तुझ्या सुनेच्या पोटी होईल. ती अस का म्हणाली असेल माहीत नाही म्हणजे तीच्या जीवाला तर धोका नाही न हे मात्र रखमानी सांगितल नाही. (पान उलटुन).” (मनाशीच पुटपुटू लागते). फक्त एवढच कस काय? म्हणजे रखमा आज्जी ती मीच आहे म्हणून साप नाग माझ्याशी बोलु शकतात. हं जर आज्जी नाग कन्या होती तर तीच्या बद्दल नागराज श्रीधर यांना नक्कीच माहीत असणार नागराजांशी बोलावच लागेल. (एवढ बोलुन परत पुढची पान उलटु लागते.). (पान उलटुन). पान नं २०. आज तीच्या बद्दल शेवटच लीहीत आहे. कारण कदाचीत पुढे माझी नात हे वाचल्यावर तीला याची मदत होईल म्हणून. बेटा हे तुझ्यासाठी. “बेटा, तु जेव्हा ही डायरी वाचशील तेव्हा मी तुझ्या जवळ नसेन. म्हणून हे अस तुला सांगतोय. तु रखमाचा पुढचा जन्म असणार आहेस. रखमा असीम शक्तींची स्वामी होती पण याचा प्रत्यय फक्त मलाच होता आपल सत्य तीने कुणाला ही सांगितल नव्हत. बेटा तुझा परत एकदा जन्म झालाय तो भयासुर पसुन नागलोकाला वाचवण्या साठी पण हे वाटत तीतक सोप्प नाही कारण तो एक दानव आहे आणि तुझ्या वर्तमान काळात तो अजुन शक्तीशाली झालेला असेल जेव्हा रखमा होता तेव्हा ती एका पुस्तका बद्दल नेहमी बोलायची पण पुस्तका पर्यंत पोहोचण्या आधीच ती आमच्या पासुन दुर निघुन गेली आता तीच कार्य तुला पुर्ण करायच आहे आणि या जगाला देखील तुलाच वाचवायच आहे ते तु कस करशील हे ते पुस्तक तुला सांगेल. तु खुप नशीबवान आहेस बेटा घाबरु नकोस जीतकी शक्तीशाली रखमा होती त्याच शक्ती तुझ्यात पण आहेत त्यांना ओळख आणि पुढे हो. शुभंम भवतु.”
क्रमश:

0 Comments